IQOO 9 SE 5G च्या किमतीत मोठी कपात, ऑफरद्वारे तुमची होणार अधिक बचत

Updated on 30-Mar-2023
HIGHLIGHTS

IQOO 9 SE 5G च्या किमतीत कपात

या फोनच्या किमतीत तीन हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.

HDFC बँक कार्ड आणि ICICI बँक कार्डवर या फोनवर 3000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट

तुम्हाला नवीन स्मार्टफोन हवंय? आणि आता तर 5G स्मार्टफोनचं हवा असेल, कारण ही आता काळाची गरज आहे. पण, एखादा उत्तम फोन खरेदी करण्यासाठी बजेट कमी आहे. तर काही काळजी करू नका IQOOचा 5G स्मार्टफोन बंपर ऑफरसह तुम्हाला खरेदी करता येणार आहे. IQOO 9 SE 5G स्मार्टफोन आता स्वस्त झाला आहे. 

कंपनीने या फोनच्या किमतीत कपात केली आहे. चाल तर मग जाणून घेऊयात फोनची नवी किंमत आणि उत्तम फीचर्स- 

IQOO 9 SE 5G च्या किमतीत कपात

हा फोन तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकता. स्मार्टफोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 3,000 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. 33,990 रुपयांचा किमतीचा हा फोन केवळ 30,990 रुपयांना खरेदी करता येईल. बँक ऑफर्समध्ये HDFC बँक कार्ड आणि ICICI बँक कार्डवर या फोनवर 3000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळतोय. येथून खरेदी करा…  

IQOO 9 SE 5G चे स्पेसिफिकेशन्स

iQOO 9SE 5G ला 6.62-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले मिळतो, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300 Nits पीक ब्राइटनेससह येतो. हा फोन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसरवर काम करतो. यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज पर्याय आहे.Android 12 वर आधारित FunTouch OS 12 वर हँडसेट काम करतो. डिव्हाइसला उर्जा देण्यासाठी, 4500mAh बॅटरी प्रदान केली गेली आहे, जी 66W जलद चार्जिंग देते.

याव्यतिरिक्त, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याची प्रायमरी लेन्स 48MP, 13MP वाईड ऍंगल लेन्स आणि 2MP मोनोक्रोम लेन्स दिली गेली आहे. समोरील बाजूस फोनमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :