प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO च्या आगामी iQOO 13 फोनच्या भारतीय लाँचची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु होती. आता अखेर या फोनची भारतीय लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे. चीनमध्ये हा फोन लाँच झाल्यानंतर आता हा फोन भारतीय लाँचसाठी सज्ज झाला आहे. काही काळापूर्वी कंपनीने पुष्टी केली होती की, कंपनी डिसेंबर 2024 मध्ये हा फोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जाईल. जाणून घेऊयात iQOO 13 ची भारतीय लाँच डेट-
Also Read: उत्तम फोटोग्राफीसाठी बेस्ट आहेत 50MP कॅमेरासह येणारे Smartphones, किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी
iQOO India चे CEO निपुण मार्या यांनी त्यांच्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून iQOO 13 स्मार्टफोनची लाँच डेट उघड केली आहे. कंपनीचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 3 डिसेंबर 2024 रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोनसाठी मायक्रो वेबसाइट लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर लाइव्ह करण्यात आली आहे.
उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त Amazon द्वारे विकला जाईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Qualcomm Snapdragon 8 Elite SoC सह येणारा हा स्मार्टफोन दुसरा स्मार्टफोन असेल.
वर सांगितल्याप्रमाणे, iQOO 13 आधीच चीनच्या बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, या फोनमध्ये Q2 सुपरकंप्युटिंग चिपसेट उपलब्ध असेल. त्याबरोबरच, या फोनमध्ये 2k सुपर रिझोल्यूशनचा डिस्प्ले असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनचे लीजेंड एडिशन देखील येणार आहे, यासाठी कंपनीने BMW सोबत भागीदारी केली आहे.
फोटोग्राफीसाठी iQOO 13 या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 50MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा असेल. iQOO 13 स्मार्टफोन 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6150mAh बॅटरीसह येईल. हे 30 मिनिटांत 100% चार्ज होईल. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि ग्रे कलर ऑप्शन्ससह लाँच होईल.