iQOO 13 लाँच होण्यापूर्वी iQOO 12 झाला स्वस्त! 50MP कॅमेरासह फोटोग्राफीचा मिळेल अप्रतिम अनुभव

iQOO 13 लाँच होण्यापूर्वी iQOO 12 झाला स्वस्त! 50MP कॅमेरासह फोटोग्राफीचा मिळेल अप्रतिम अनुभव
HIGHLIGHTS

iQOO 13 फोन येत्या 3 डिसेंबर रोजी हा स्मार्टफोन भारतात लाँच होणार

लाँचआधीच कंपनीने जुने मॉडेल iQOO 12 ची किंमत स्वस्त केली आहे.

सध्या Amazon India वर या हँडसेटची किंमत कमी करण्यात आली आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO चा लेटेस्ट फोन iQOO 13 नुकतेच चीनच्या बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर, आता हा स्मार्टफोन भारतीय लाँचसाठी सज्ज झाला आहे. येत्या 3 डिसेंबर रोजी हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. मात्र, iQOO 13 च्या लाँचआधीच कंपनीने जुने मॉडेल iQOO 12 च्या किमतीत कपात करण्यात आली आहे. सध्या Amazon India वर या हँडसेटची किंमत कमी करण्यात आली आहे. लाँच होताच हा फोन फोटोग्राफीसाठी लोकप्रिय झाला. जाणून घेऊयात iQOO 12 स्मार्टफोनची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: Price Drop! लेटेस्ट Vivo V40 Pro स्मार्टफोनच्या किमतीत कपात, ‘या’ ठिकाणी मिळतोय भारी Discount

iqoo 12

iQOO 12 ची किंमत आणि ऑफर्स

iQOO भारतात आपला नवीन हँडसेट लाँच करणार आहे, ज्याचे नाव iQOO 13 असेल. त्याआधी, iQOO 12 ची किंमत खूपच कमी करण्यात आली आहे. iQOO 12 च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची पूर्वीची किंमत 59,999 रुपये होती, मात्र आता ती 52,999 रुपये इतकी झाली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर बँक ऑफर्स उपलब्ध आहेत, ज्या अंतर्गत ग्राहकांना सहजपणे 3 हजार रुपयांची सूट मिळेल. iQOO 12 सह एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमचा जुना हँडसेट एक्सचेंज करू शकता. येथून खरेदी करा

iQOO 12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO 12 मध्ये 6.78-इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. लक्षात घ्या की, हा हँडसेट Android 14 सह येतो आणि तो Android 15 वर देखील अपग्रेड केला जाईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, , iQOO 12 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरसह सज्ज आहे. स्टोरज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 12GB आणि 16GB रॅम आणि 512 GB स्टोरेजसह सज्ज करण्यात आला आहे.

iqoo 12 5g flagship phone with snapdragon processor get huge discount now

iQOO 12 मध्ये फोटोग्राफीसाठी अप्रतिम ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा प्राथमिक सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 3x ऑप्टिकल झूमसाठी 64MP पेरिस्कोप झूम लेन्सचा समावेश आहे. पेरिस्कोपिक लेन्स 100x पर्यंत डिजिटल झूमला देखील सपोर्ट करते. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, iQOO 12 5G मध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते, तर 50W वायरलेस चार्जिंग देखील या फोनमध्ये उपलब्ध आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo