आगामी iQOO 12 5G बद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. दरम्यान, या स्मार्टफोनची प्री-बुकिंग आजपासून सुरू होणार आहे. हे आगामी डिव्हाइस अधिकृत स्टोअर आणि ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा डिवाइस पुढील आठवड्यात 12 डिसेंबर रोजी भारतात लाँच केला जाईल.
Qualcomm च्या टॉप क्लास प्रोसेसर Snapdragon 8 Gen 3 सह भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणारा हा पहिला मोबाईल फोन आहे. सध्या टेक विश्वात सर्वत्र या लेटेस्ट प्रोसेसरची चर्चा सुरु आहे.
iQOO 12 5G चे प्री-बुकिंग Amazon India वर दुपारी 12 वाजता सुरू होईल, जी 7 डिसेंबरपर्यंत म्हणजे अजून दोन दिवस सुरु असेल. हा फोन फक्त 999 रुपयांमध्ये प्री-बुक करता येईल. त्याबरोबरच, प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना Vivo earbuds मोफत दिले जातील. या इयरबड्सची किंमत 2,999 रुपये आहे. ही प्री-बुकिंग अमाऊंट रिफंडेबल असेल, असे कंपनीने सांगितले आहे.
आत्तापर्यंत समोर आलेल्या लीकवर विश्वास ठेवला तर, फोनची सुरुवातीची किंमत 50 ते 55 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते. स्मार्टफोनची खरी किंमत लाँच झाल्यानंतरच कळेल.
लीकनुसार, iQOO 12 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिफ्रेश रेट 144Hz आहे. त्याची स्क्रीन HDR10+ ला सपोर्ट करते. यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर असेल, याबाबत पुष्टी आधीच करण्यात आली आहे. तसेच, फोनमध्ये 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे.
कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. यात 50MP मेन लेन्स, 50MP अल्ट्रा वाइड अँगल आणि 64MP टेलिफोटो सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 120W फ्लॅश चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करू शकते.