भारतात किती असेल आगामी iQOO 12 ची किंमत, तुमच्या बजेटमध्ये येईल का फोन? Tech News 

भारतात किती असेल आगामी iQOO 12 ची किंमत, तुमच्या बजेटमध्ये येईल का फोन? Tech News 
HIGHLIGHTS

भारतात फक्त या फोनचे स्टॅंडर्ड मॉडेल म्हणजेच iQOO 12 आणले जात आहे.

iQOO 12 ची भारतीय किंमत टिपस्टर मुकुल शर्माने लीक केली आहे.

iQOO 12 स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटसह इन-हाउस Q1 चिपसह लाँच केला जाईल.

या महिन्यात आगामी iQOO 12 स्मार्टफोन 12 डिसेंबर रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. हा फोन भारतापूर्वी चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. मात्र, iQOO 12 आणि iQOO 12 Pro चीनमध्ये लाँच करण्यात आले. पण, भारतात फक्त या फोनचे स्टॅंडर्ड मॉडेल म्हणजेच iQOO 12 आणले जात आहे. भारतात लाँच होण्यापूर्वी या फोनची किंमत ऑनलाईन लीक झाली आहे.

होय, iQOO 12 ची भारतीय किंमत टिपस्टर मुकुल शर्माने लीक केली आहे. टीपस्टरने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर या स्मार्टफोनची अपेक्षित किंमत सांगितली आहे. एवढेच नाही तर, फोनच्या रिटेल बॉक्सचा फोटो देखील शेअर केला आहे.

iQoo 12 Price leaked
iQoo 12 Price leaked

iQOO 12 ची भारतीय लीक किंमत

चीनमध्ये iQOO 12 ची किंमत 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलसाठी RMB 3,999 म्हणजेच अंदाजे 45,800 रुपये पासून सुरू होते. iQOO 12 ची भारतीय किंमत प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्माने ऑनलाईन लीक केली आहे. खरी किंमत उघड झाली नाही परंतु ती 60,000 रुपयांपेक्षा कमी असेल. कारण बॉक्समध्ये त्याची किंमत 5X,999 रुपये अशी दर्शविली जात आहे.

त्यामुळे टिपस्टरनुसार, iQOO 12 ची किंमत 56,999 रुपये असेल किंवा त्यापेक्षा कमी/जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फोन 12GB + 256GB आणि 16GB + 512GB च्या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केले जाईल असे देखील म्हटले जाते. त्यामुळे सुरुवातीची किंमत 56,999 रुपये असण्याची शक्यता आहे.

BMW ब्रँडिंगसह हा स्मार्टफोन व्हाईट आणि ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये येईल, अशी देखील माहिती मिळाली आहे.

iQOO 12 चे स्पेसिफिकेशन्स

iQOO 12 स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटसह इन-हाउस Q1 चिपसह लाँच केला जाईल. स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 64MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्ससह ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल.

अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार, iQOO 12 फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा 1.5K LTPO OLED डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजसह येऊ शकतो. फोनमध्ये OIS सह 50MP 1/1.3-इंच प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 3x झूम आणि 100x डिजिटल झूमसह 64MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा मिळेल. तसेच, सेल्फीसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 120W फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी देण्यात येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo