iQOO 12 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. या स्मार्टफोनबद्दल सध्या अनेक लीक्स समोर येत आहेत. लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये फोनचे खास स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. फीचर्ससोबतच आता स्मार्टफोनच्या लाँच डेटचीही माहिती देण्यात आली आहे. भारतात Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येणारा हा पहिला स्मार्टफोन असू शकतो, असे देखील म्हटले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही क्वालकॉमची आगामी चिप आहे, जी ऑक्टोबरच्या शेवटी लाँच होण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा: OnePlus 11 5G वर थेट 7,000 रुपयांचा Discount, महागडे TWS देखील मिळतील Free! Tech News
लोकप्रिय टिपस्टर मुकुल शर्माने त्याच्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर खात्यावरून ट्विट केले आहे की, iQOO 12 नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या शेवटी भारतात लाँच होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, क्वालकॉम 24 ते 26 ऑक्टोबर दरम्यान आपली नवीन चिप सादर करू शकतो. यानंतर, iQOO 12 या प्रोसेसरसह भारतात प्रवेश करेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, लक्षात घ्या की iQOO ने अद्याप फोनच्या लॉन्च तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
वर सांगितल्याप्रमाणे, iQOO 12 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. या फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत अंतर्गत स्टोरेज असण्याची शक्यता आहे, यामध्ये फोन 256GB, 512GB आणि 1TB या तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो.
फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य सेन्सर, 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 64MP टेलिफोटो लेन्स मिळू शकतात. आगामी स्मार्टफोन Funtouch OS 13 किंवा Origin OS 4.0 वर चालेल. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी, कंपनी त्यात 5000mAh बॅटरी देऊ शकते, जी तब्बल 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.