iQOO 12 जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे. आता हा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, अधिकृत लाँच होण्यापूर्वीच कंपनीने या फोनच्या प्रोसेसरचा खुलासा करण्यात आला आहे. त्याबरोबरच, डिस्प्ले संबंधित अपडेट्स देखील देण्यात आले आहेत. चला तर मग बघुयात स्मार्टफोन्सबाबत सर्व माहिती-
हे सुद्धा वाचा: Jio चा Best प्लॅन! दररोज 5GB डेटासह Free मिळेल अतिरिक्त 16GB डेटा, जाणून घ्या किंमत
iQOO 12 स्मार्टफोन 12 डिसेंबर रोजी भारतीय बाजारात लाँच करण्यात येईल. लक्षात घ्या की, आतापर्यंत समोर आलेल्या लीकमध्ये असा दावा केला जात आहे की, या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 50 हजार ते 60 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, या स्मार्टफोनची खरी किंमत लाँच झाल्यानंतरच कळेल.
Amazon India वरील सक्रिय मायक्रोसाइटनुसार, iQOO 12 मध्ये 144FPS गेम फ्रेमसह मोठा कर्व डिस्प्ले असेल. त्याबरोबरच, फोनमध्ये व्हेपर चेंबरचा सपोर्टही मिळेल. याशिवाय, iQOO 12 स्मार्टफोन Qualcomm च्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसर Snapdragon 8 Gen 3 सह ऑफर केला जाईल. ही चिप डिव्हाइसची कार्यक्षमता 30 पट वाढवेल, असे सांगण्यात आले आहे. तसेच, हा प्रोसेसर एक चांगला गेमिंग अनुभव प्रदान करणार आहे.
अलीकडील अहवालांवर विश्वास ठेवला तर, iQOO 12 चे जागतिक व्हेरिएंट भारतीय बाजारपेठेत लाँच केला जाऊ शकते. याद्वारे फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, असे समजते. म्हणेजच यात 64MP टेलिफोटो लेन्स आणि दोन 50MP सेन्सर असतील. सेल्फीसाठी 16MP कॅमेरा उपलब्ध असेल. फोनमध्ये 120W जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000mAh बॅटरी देखील उपलब्ध असेल.
इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम, हेडफोन जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स असतील. मात्र, या फोनचे कन्फर्म स्पेसिफिकेशन्स देखील लाँच झाल्यानंतरच तुम्हाला समजतील.