IQOO 12 ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! Powerful Snapdragon 8 Gen 3 प्रथमच होणार स्मार्टफोनसह उपलब्ध। Tech News

Updated on 01-Nov-2023
HIGHLIGHTS

IQOO 12 सिरीजमध्ये iQOO 12 आणि iQOO 12 Pro सारखे दोन मॉडेल समाविष्ट आहेत.

हा मोबाईल भारतीय यूजर्ससाठी 12 डिसेंबर रोजी लाँच केला जाईल.

iQOO 12 मध्ये, ब्रँड आजपर्यंतचा सर्वात वेगवान Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट देणार आहे.

iQOO आपली iQOO 12 सिरीज 7 नोव्हेंबर रोजी चीनमध्ये सादर करणार आहे. हे iQOO 12 आणि iQOO 12 Pro सारखे दोन मॉडेल समाविष्ट आहेत. दरम्यान, आता कंपनीने या मालिकेतील सामान्य मॉडेल IQOO 12 ची भारतात लाँच तारीख देखील निश्चित केली आहे. हा मोबाईल भारतीय यूजर्ससाठी 12 डिसेंबर रोजी लाँच केला जाईल. आम्ही तुम्हाला नवीन टीझर पोस्ट आणि फोनच्या सेल प्लॅटफॉर्मबद्दल सर्व माहिती देणार आहोत.

iQOO 12 भारतीय लाँच डेट

iQOO ने नवीन टीझर पोस्टर जारी करून iQOO 12 5G मोबाईलच्या लाँच तारखेची पुष्टी केली आहे. तुम्ही पोस्टमध्ये पाहू शकता की, हा डिवाइस 12 डिसेंबर रोजी इंडियन टेक प्लॅटफॉर्मवर सादर केला जाईल. मोबाईलचा मागील कॅमेरा देखील पोस्टमध्ये दर्शविला गेला आहे, जो यापूर्वीच्या लीकमध्ये देखील उघड झाला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, पोस्टरमध्ये कंपनीने BMW मोटर स्पोर्ट स्पेशल एडिशन मॉडेलचाही उल्लेख केला आहे. हा मोबाइल 12 डिसेंबरच्या लाँच तारखेपूर्वी किंवा नंतर सादर केला जाऊ शकतो. याशिवाय, हे उपकरण खास ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

iQOO 12 चे अपेक्षित स्पेसीफिकेक्शन्स

iQOO 12 मध्ये 6.78-इंच लांबीचा BOE OLED डिस्प्ले असू शकतो, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे iQOO 12 मध्ये, ब्रँड आजपर्यंतचा सर्वात वेगवान Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट देणार आहे. कंपनीने याबद्दल आधीच कन्फर्म केले आहे. सुरक्षेसाठी ऑप्टिकल इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनरही दिला जाऊ शकतो. बॅटरीच्या बाबतीत, डिव्हाइस 5,000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज असू शकतो.

iQOO 12 मोबाईल 16GB पर्यंत LPDDR5x RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.0 अंतर्गत स्टोरेज मिळवू शकतो. फोटोग्राफीसाठी मागील कॅमेरा सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50MP OmniVision OV50H प्रायमरी सेन्सर, 50MP सॅमसंग JN1 अल्ट्रावाइड कॅमेरा, 3x डिजिटल zoom00 आणि 3x optical zoom00 सह 64MP OV64B टेलिफोटो लेन्सचा समावेश असू शकतो. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MP लेन्स मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :