iQOO ने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन iQOO 12 भारतात लाँच केला. आता ब्रँडने भारतीय टेक प्लॅटफॉर्मवर iQOO 12 डेझर्ट रेड ॲनिव्हर्सरी एडिशन लाँच केले आहे. लक्षात घ्या की, हा स्मार्टफोन कंपनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त खास सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये यूजर्सना बॅक पॅनलवर रेड लेदर फिनिश दिले जाईल. चला तर मग जाणून घेऊयात मोबाईलच्या किंमत आणि उपलब्धता.
हे सुद्धा वाचा: How to: आजच तुमच्या फोनमध्ये ‘ही’ सेटिंग करा, काम झाल्यावर आपोआप डिलीट होतील OTP। Tech News
iQOO 12 Desert Red Anniversary Edition भारतीय बाजारात दोन व्हेरिएंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.
डिव्हाइसच्या 12GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 52,999 रुपये निश्चित केली गेली आहे. तर, फोनच्या 16GB RAM + 512GB स्टोरेज पर्याय 57,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 9 एप्रिलपासून ई-कॉमर्स साइट Amazon आणि ब्रँडच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
याव्यतिरिक्त, iQOO 12 Desert Red Anniversary Edition वर काही ऑफर्सदेखील मिळणार आहेत. लॉन्च ऑफर अंतर्गत, HDFC आणि ICICI बँक कार्डवर 3,000 रुपयांची झटपट सूट दिली जाईल. तर, 9 महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI पर्याय देखील मिळेल.
आधीच्या मॉडेलप्रमाणेच iQOO 12 Desert Red Anniversary Edition मध्ये फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आहेत. यामध्ये तुम्हाला 6.78-इंच लांबीचा 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. हा डिव्हाइस क्वालकॉमच्या सर्वात वेगवान स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटद्वारे देखील समर्थित आहे.
फोटोग्राफीसाठी, यात OIS सपोर्टसह 50MP Omnivision OV50H प्रायमरी सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल सॅमसंग JN1 सेन्सर आणि 100x पर्यंत डिजिटल झूम असलेला OIS सह 64MP 3x टेलिफोटो कॅमेरा मिळेल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 5000mAh बॅटरी आहे.