digit zero1 awards

 Just Arrived! बहुप्रतीक्षित iQOO 12 आणि iQOO 12 Pro फोन Powerful प्रोसेसरसह लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

 Just Arrived! बहुप्रतीक्षित iQOO 12 आणि iQOO 12 Pro फोन Powerful प्रोसेसरसह लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
HIGHLIGHTS

बहुप्रतीक्षित iQOO 12 सिरीज अखेर लाँच करण्यात आली आहे.

विशेषतः ही सिरीज Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा OIS सह येतो.

बहुप्रतीक्षित iQOO 12 सिरीजची चर्चा टेक विश्वात बऱ्याच काळापासून सुरु होती. आता अखेर ही सिरीज लाँच झाली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने iQOO 12 आणि iQOO 12 Pro मॉडेल सादर केले आहेत. नावावरून तुम्हाला हे समजलेच असेल की, फोन iQOO 11 आणि iQOO 11 Pro मॉडेल्ससाठी अपग्रेड व्हर्जन आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन सिरीज अपग्रेड केलेल्या डिझाइन आणि फीचर्ससह आली आहे.

विशेष म्हणजे हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा OIS सह येतो. दोन्ही फोनमध्ये बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचे फीचर्स वेगवेगळे आहेत.

हे सुद्धा वाचा: Vivo ची दिवाळी ऑफर! लोकप्रिय स्मार्टफोन Discountसह खरेदी करण्याची संधी, मिळेल 10 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक। Tech News

IQOO 12
IQOO 12

iQOO 12 आणि iQOO 12 Pro ची किंमत

लेटेस्ट स्मार्टफोन्स सीरिजच्या किमतीबदल बोलायचे झाल्यास, चीनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लाँच झालेल्या iQOO 12 ची किंमत CNY 3,999 म्हणजेच अंदाजे 46,448 रुपये आहे. तर त्याचा, iQOO 12 Pro व्हेरिएंट CNY 4,999 म्हणेजच अंदाजे 58,070 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. हा फोन ब्लॅक, व्हाइट आणि रेड या तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

iQOO 12 आणि iQOO 12 Pro

डिस्प्ले

कंपनीने iQOO 12 फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1.5K आहे. तर दुसरीकडे, iQOO 12 Pro मॉडेल 6.7-इंच डिस्प्लेसह येते, ज्याचे रिझोल्यूशन 2K आहे. या डिस्प्लेमध्ये कर्व एज देण्यात आल्या आहेत. दोन्ही फोन 144Hz रीफ्रेश दर आणि 3,000 Nits च्या कमाल ब्राइटनेससह येतात.

प्रोसेसर

IQOO 12 सिरीजमधील फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहेत. या फोनमध्ये ई-स्पोर्ट्ससाठी समर्पित Q1 चिपसेट देखील आहे, जो तुम्हाला एक उत्तम गेमिंग अनुभव देईल. हा फोन Android 14 वर आधारित OriginOS 4 वर काम करतो.

iQoo 12

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP मेन कॅमेरा OIS सपोर्टसह येतो. याशिवाय, फोनमध्ये 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 64MP टेलिफोटो सेन्सर समाविष्ट आहे. यात आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा उपलब्ध आहे.

बॅटरी

वर सांगितल्याप्रमाणे, दोन्ही फोन बॅटरीच्या बाबतीत एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. IQOO 12 मध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यासह 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

तर दुसरीकडे, प्रो मॉडेलमध्ये 5,100mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo