लेटेस्ट IQOO 12 5G स्मार्टफोनची Sale आजपासून भारतात होणार सुरु, Best ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करण्याची संधी  

 लेटेस्ट IQOO 12 5G स्मार्टफोनची Sale आजपासून भारतात होणार सुरु, Best ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करण्याची संधी  
HIGHLIGHTS

लेटेस्ट IQOO 12 5G आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोनची विक्री Amazon India आणि कंपनीची अधिकृत साईट IQOO India वर होणार

बहुप्रतीक्षित आणि टेक विश्वात जोरदार चर्चेचा विषय असलेला लेटेस्ट IQOO 12 5G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झालेला आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आणि 120W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आहे. दरम्यान, लेटेस्ट IQOO 12 5G आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. पहिल्या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर भारी ऑफर्सदेखील मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात IQOO 12 5G चे पहिल्या सेलचे संपूर्ण तपशील.

IQOO 12 5G FIRST SALE IN INDIA

IQOO 12 5G किंमत आणि Sale ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे, IQOO 12 5G फोनची विक्री Amazon India आणि कंपनीची अधिकृत साईट IQOO India वर आजपासून म्हणजेच 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. लक्षात घ्या की, काल म्हणजेच 13 डिसेंबरपासून प्राधान्य वापरकर्त्यांसाठी हा फोन उपलब्ध झालेला आहे. कंपनीने हा फोन व्हाईट आणि ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला आहे.

iQOO 12 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तर, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 52,999 रुपये आहे. तर, फोनचे 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटमध्ये येते, ज्याची किंमत 57,999 रुपये आहे. ऑफर्समध्ये, ICICI आणि HDFC बँक कार्डद्वारे 3000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्यानंतर, हा स्मार्टफोन तुम्हाला अनुक्रमे 49,999 आणि 54,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

iQOO 12 Camera

IQOO 12 5G

iQOO 12 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, डिस्प्लेचे रिफ्रेश रेट 144Hz आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यासह, तुम्हाला 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. या फोनमध्ये Q1 सुपर कॉम्प्युटिंग गेमिंग चिप देखील देण्यात आली आहे. हा फोन Android 14 आधारित Funtouch OS 14 वर काम करतो.

कॅमेरा विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरामध्ये OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच, फोनमध्ये 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 64MP पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर प्रदान करण्यात आला आहे. ज्यासह तुम्हाला 3x ऑप्टिकल झूमचे सपोर्ट देखील मिळेल. तुम्हाला 16MP फ्रंट कॅमेरा देखील सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंग करता मिळणार आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo