iQOO 11 भारतातील पहिला Snapdragon 8 Gen 2 फोन, वाचा डिटेल्स…

iQOO 11 भारतातील पहिला Snapdragon 8 Gen 2 फोन, वाचा डिटेल्स…
HIGHLIGHTS

iQOO 11 स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेटसह लॉन्च

फोन 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंगने सुसज्ज आहे.

iQOO 11 5G ची किंमत 59,999 रुपयांपासून सुरू होते.

iQOO 11 भारतात पहिला Snapdragon 8 Gen 2 स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. फ्लॅगशिप-ग्रेड फोन Android 13, 120W चार्जिंग, 144Hz डिस्प्ले आणि बरेच काही यासारख्या उच्च श्रेणीच्या फीचर्ससह सुसज्ज आहे.

 हे सुद्धा वाचा : BSNL चा जबरदस्त प्लॅन, 84 दिवसांची वैधता आणि किमंत फक्त 100 रुपयांच्या जवळपास…

iQOO 11 ची किंमत आणि उपलब्धता 

iQOO India ने iQOO 11 ची 8+256GB व्हेरियंटची किंमत 59,999 रुपये आणि 16+256GB मॉडेलसाठी 64,999 रुपये आहे. मात्र, सुरुवातीच्या सवलतीनंतर, तुम्ही अनुक्रमे 54,999 आणि 59,999 रुपयांना फोन खरेदी करू शकता. फोनची विक्री Amazon India आणि कंपनीच्या स्वतःच्या वेबसाइटवर 13 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.

IQOO 11 स्पेसिफिकेशन्स

 iQOO 11 मध्ये 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.78-इंच 2K LTPO4 AMOLED स्क्रीन आहे. फोनमध्ये हेडफोन जॅक देखील दिलेला नाही. परंतु, डिव्हाइसमध्ये तुम्हाला 5G, अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, वायफाय 6 आणि ब्लूटूथ 5.3 सारखी इतर वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. फोनला 5000mAh बॅटरी आणि 120W PD 3.0 वायर्ड चार्जिंग मिळत आहे.

मागील कॅमेरा पॅनेलमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 13MP (2x) टेलीफोटो शूटर आणि 8MP अल्ट्रावाइड स्नॅपर आहे. फोन Snapdragon 8 Gen 2 चिपसेट द्वारे समर्थित आहे. तसेच, 256GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज आणि 16GB LPDDR5x RAM सह सुसज्ज आहे. डिव्‍हाइसमध्‍ये कोणतेही एक्‍सपेंडेबल स्‍टोरेज दिलेले नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo