Limited Time Deal! iQOO 12 लाँच होण्यापूर्वी iQOO 11 5G च्या किमतीत मोठी कपात, अप्रतिम इयरबड्स देखील Free 

Limited Time Deal! iQOO 12 लाँच होण्यापूर्वी iQOO 11 5G च्या किमतीत मोठी कपात, अप्रतिम इयरबड्स देखील Free 
HIGHLIGHTS

नव्या सिरीजच्या iQOO 11 5G ची किंमत कमी केली आहे.

फोनच्या खरेदीवर 2,000 रुपयांची झटपट सूटही दिली जात आहे.

ही ऑफर 23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठीच लाईव्ह आहे.

iQOO 12 5G नुकतेच टेक विश्वात लाँच करण्यात आले आहे. लक्षात घ्या की, हा स्मार्टफोन पुढील महिन्यात 12 डिसेंबर रोजी भारतात लाँच केला जाईल. फोन लाँच होण्यापूर्वी कंपनीने आपल्या मागील मॉडेल iQOO 11 5G ची किंमत कमी केली आहे. एवढेच नाही तर हा फोन लाँच झाल्यानंतर जुने मॉडेलही बंद केले जाईल, असे वृत्त देखील आहे. दरम्यान, कंपनीने नव्या सीरिजच्या लाँचआधी जुन्या फोनच्या किमतीत कपातीबाबत घोषणा केली आहे.

iQOO 11 5G च्या किमतीत मोठी कपात

iQOO इंडियाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये फोनच्या किंमतीतील कपातीची घोषणा केली आहे. त्याचा 16GB रॅम + 256GB व्हेरिएंट आता 49,999 रुपयांना उपलब्ध होईल. हा फोन Amazon वर 51,999 रुपयांना सूचिबद्ध झाला आहे. फोनच्या खरेदीवर 2,000 रुपयांची झटपट सूटही दिली जात आहे.

एवढेच नाही तर, या फोनच्या खरेदीवर Vivo TWS Air देखील मोफत देण्यात येतील. मात्र, ही ऑफर 23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठीच लाईव्ह आहे, असे देखील म्हटले जात आहे. 

iQOO 11 5G चे मुख्य तपशील

iQOO च्या या फ्लॅगशिप फोनमध्ये 6.78 इंच 2K E6 AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह येतो. फोन 16GB पर्यंत LPDDR5x रॅमला सपोर्ट करतो. ट्रिपल कॅमेरा सेटअपसह याचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे, ज्यामध्ये Samsung ISOCELL GN5 सेन्सर वापरण्यात आला आहे. त्यासोबत, OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरचा सपोर्ट आहे. याशिवाय, फोनमध्ये 13MP टेलिफोटो कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळेल.

iqoo 11 5g

तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा असेल. हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतो, ज्यामध्ये 120W फास्ट चार्जिंग फीचर देण्यात आले आहे.

दरम्यान, कंपनीने चीनी बाजारात iQOO 12 आणि iQOO 12 Pro 5G सादर केले आहेत. मात्र, केवळ त्याचे स्टॅंडर्ड मॉडेल iQOO 12 भारतात लाँच केले जाईल. कंपनी भारतात प्रो मॉडेल लाँच करत नाही. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 सह अनेक अप्रतिम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo