iPhone SE4 आता 6 इंचपेक्षा मोठ्या स्क्रीनसह येऊ शकतो, डिटेल्स आले समोर
Apple लवकरच iPhone SE सीरीजची 4th जनरेशन लाँच करणार
हा स्मार्टफोन 6.1-इंच लांबीच्या LCD स्क्रीनसह टॉप नॉच कटआउटसह सुसज्ज असू शकतो.
येत्या iPhone SE 4 ची डिझाईन iPhone XR सारखी असू शकते.
तुम्ही जर iPhoneचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. iPhone SE सीरीज लाँच होऊन 2 वर्षे झाली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीने या सीरिजचा 3rd जनरेशन iPhone लाँच केला होता, ज्याला खूप पसंती मिळाली होती. आता अशी माहिती आहे की, दिग्गज तंत्रज्ञान कंपनी Apple लवकरच iPhone SE सीरीजची 4th जनरेशन लाँच करणार आहे.
हे सुद्धा वाचा : प्रवासात कॅरी करण्यास सोपे आहेत 'हे' 4 परवडणारे ब्लूटूथ स्पीकर, Amazonवर बघा खास डिल्स
डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टंट्स (DSCC) चे विश्लेषक रॉस यंग यांच्या मते, हा स्मार्टफोन 6.1-इंच लांबीच्या LCD स्क्रीनसह टॉप नॉच कटआउटसह सुसज्ज असू शकतो. हा स्मार्टफोन पूर्वीपेक्षा कसा वेगळा आहे आणि नवीन फीचर्स तुम्हाला किती आकर्षित करणार हे जाणून घेऊयात…
iPhone SE 4 मध्ये काय असेल खास
विश्लेषक रॉस यंग म्हणतात की, हा स्मार्टफोन 2024 मध्ये लाँच करण्याची योजना आहे. हा स्मार्टफोन 6.1-इंच लांबीच्या LCD स्क्रीनसह वरच्या बाजूला नॉच कटआउटसह सुसज्ज असू शकतो. यासोबतच फ्रंट कॅमेऱ्याचा कटआउट होल शेपचा असेल. अनेक रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की, इतर iPhones प्रमाणे यातही TochID चे फीचर असू शकते.
मात्र, इतर iPhone मॉडेल्सप्रमाणे या फोनच्या फ्रंट कॅमेरामध्येही फेसआयडी सपोर्ट असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असेही वृत्त आहे की, आगामी iPhone SE 4 चा नॉच मागील मॉडेलपेक्षा लहान असू शकतो. तर सुरुवातीला प्रसिद्ध लीकस्टर जॉन प्रोसरने सांगितले होते की, आगामी iPhone SE 4 ची डिझाईन iPhone XR सारखी असू शकते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile