अॅप्पलने भारतामध्ये आपला नवीन आयफोन SE आणि 9.7 इंचाचा आयपॅड प्रो टॅबलेट लाँच केले. कंपनीने मागील महिन्यातच भारतात आपले दोन नवीन डिवाइस लाँच केले होते.
आयफोन SE आणि 9.7 इंच आयपॅड प्रो (वायफाय/सेल्युलर) आतापासून भारतामध्ये कंपनीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल पार्टनर्सवर उपलब्ध करण्यात आला आहे. आयफोन SE मध्ये दोन स्टोरेज व्हर्जन उपलब्ध आहे 32GB आणि 64GB. ह्यांची किंमत अनुक्रमे ३९,००० रुपये आणि ४९,००० रुपये आहे.
तर आयपॅड प्रो 32GB, 128GB आणि 256GB स्टोरेज व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. ह्याच्या 32GB वायफाय मॉडलची किंमत ४९,०००, 128GB ची किंमत ६१,९०० रुपये आणि 256GB मॉडलची किंमत ७३,९०० रुपये आहे.
ह्याच्या वायफाय-सेल्युलर मॉडलच्या 32GB ची किंमत ६१,९०० रुपये, 128GB मॉडलची किंमत ७३,९०० रुपये आणि 256GB मॉडलची किंमत ८५,९०० रुपये आहे.
हेदेखील पाहा – ह्या अॅप्सच्या माध्यमातून भारतातील प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट
अॅप्पलने मागील महिन्यातच भारतामध्ये आपली अॅप्पल वॉचच्या किंमतीवर काम केले होते. ह्याचा सर्वात स्वस्त व्हर्जन सपोर्ट (38mm) मॉडल आता २५,९०० रुपयापासून सुरु होतो.
हेदेखील वाचा – ड्यूल कॅमे-याने सुसज्ज असलेला हुआवे P9, P9 प्लस स्मार्टफोन लाँच
हेदेखील वाचा – मिजू M3 नोट: 4100mAh क्षमतेची बॅटरी लाइफ देणारा स्मार्टफोन