अॅप्पल आयफोन SE 64GB ची भारतात किंमत असेल ४९,००० रुपये
अॅप्पल इंडिया वेबसाइटनुसार, आयफोन SE चा 64GB मॉडल ४९,००० रुपयात मिळेल. हा गोल्ड, रोझ गोल्ड, सिल्वर आणि स्पेस ग्रे रंगात उपलब्ध होईल.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी अॅप्पलने अलीकडेच एका कार्यक्रमामध्ये आपला नवीन आयफोन SE लाँच केला होता आणि ८ एप्रिलला कंपनी आपल्या ह्या नवीन फोनला भारतात लाँच करेल.
भारतात आयफोन SE ची किंमत ३९,००० रुपयांपासून सुरु होईल. आतापर्यंत ह्याच्या 64GB च्या व्हर्जनच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती मिळालेली नव्हती. मात्र आता ह्याच्या 64GB ची व्हर्जनची किंमत समोर आली आहे. अॅप्पल इंडिया वेबसाइटनुसार, आयफोन SE चा 64GB मॉडल ४९,००० रुपयात मिळेल. हा गोल्ड, रोझ गोल्ड, सिल्वर आणि स्पेस ग्रे रंगात उपलब्ध होईल.
हेदेखील पाहा – कसा होता शाओमीचा आतापर्यंतचा प्रवास?
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्याचे फीचर्स आयफोन 6S प्रमाणे आहेत, मात्र हा दिसायला ४ इंचाचा डिस्प्ले असलेल्या आयफोन 5S प्रमाणे आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, आयफोन SE मध्ये जो प्रोसेसिंग पॉवर दिला आहे, तो एकदम आयफोन 6S सारखा आहे. त्याचबरोबर आयफोन SE, आयफोन 5S पेक्षा दुप्पट शक्तिशाली आहे.
तसेच ह्यात आपल्याला A9 प्रोसेसर आणि M9 मोशनचा को-प्रोसेसर मिळत आहे. ह्यात आपल्याला 12MP चा iSight रियर कॅमेरा 4K व्हिडियो सपोर्टसह मिळत आहे. त्याशिवाय आयफोन SE मध्ये 1.2MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे. त्याचबरोबर हा अॅप्पल पे सपोर्टसह येतो आणि त्याचबरोबर ह्यात एक टच आयडी फिंगरप्रिंट सेंसरही मिळतो.
हेदेखील वाचा – BSNL 14 टेलिकॉम वर्तुळात सुरु करणार 4G सेवा
हेेदेखील वाचा – हिरेजडित असलेल्या सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचची किंमत आहे १० लाख रुपये