Apple चा नवा iPhone iPhone SE 4 लवकरच बाजारात दाखल होऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, iPhone SE 4 लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो. लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये iPhone SE 4 ची काही फीचर्स समोर आली आहेत. तर दुसर्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की iPhone SE मॉडेल 2024 पासून बंद केले जाईल. म्हणजेच एकीकडे Apple कडून फोन आणण्याची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे या सीरिजचा पूर्वीचा फोन बंद करण्याचीही योजना कंपनीकडून आखली जात आहे.
हे सुद्धा वाचा : WhatsApp PNR Checker : WhatsApp द्वारे PNR आणि लाईव्ह ट्रेन स्टेटस कसे तपासायचे…
लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, iPhone SE 4 मध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा छोटा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, iPhone SE 4 5.7-इंच किंवा 6.1-इंच लांबीच्या डिस्प्लेसह येईल. मिंग-ची कुओच्या मते, iPhone SE 4 मध्ये 6.1-इंच लांबीचा डिस्प्ले असेल.
सध्या, iPhone SE 3 टचआयडी होम बटनसह 4.7-इंच डिस्प्लेसाठी समर्थनासह येतो. यासोबतच, iPhone SE 4 ची डिझाईन iPhone XR सारखीच असेल आणि त्याच्या एजेस राउंड असण्याची शक्यता आहे. नवीन अहवाल सूचित करतात की, कंपनी TouchID होम बटन काढून टाकू शकते. असेही म्हटले जाते की, iPhone SE 4 मध्ये मोठे बदल पाहिले जाऊ शकतात.
चिपसेट बद्दल बोलायचे झाले तर, iPhone SE 4 फोन नवीन Bionic चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो. यापूर्वी हा प्रोसेसर iPhone14 सिरीजच्या प्रो मॉडेलमध्ये पाहिला होता. नवीन iPhone 5G सपोर्टसह येईल.