आयफोन 7 विषयी झाला नवा खुलासा, टच बटन होमसह असणारा वॉटरप्रुफ
मागील वर्षी समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, असे सांगितले जात आहे की, लवकरच येणारा आयफोन 7 वॉटरप्रुफ असेल. अॅप्पलकडून येणारा हा पहिला फोन असेल ज्यात हे फीचर असणार आहे.
मागील वर्षी समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, असे सांगितले जात आहे की, लवकरच येणारा आयफोन 7 वॉटरप्रुफ असेल. अॅप्पलकडून येणारा हा पहिला फोन असेल ज्यात हे फीचर असणार आहे. आणि आता नवीन आलेल्या रिपोर्टमध्येही हीच माहिती देण्यात आली आहे.
आयफोन 7 आपल्या चाचणीच्या तिस-या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. हा वॉटर आणि डस्टप्रूफ असेल. त्याशिवाय ह्यात एक टच-सेंसेटिव्ह होम बटन असेल. आता तुम्हाला हा प्रेस करावा लागणार नाही. कारण आता ह्यात टच होम बटन असणार आहे. त्याशिवाय हा आयफोन 3D टचसह येणार आहे. ह्याचाच अर्थ हा प्रेशर सेंसेटिव्ह असेल.
हेदेखील वाचा – ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स
तरीही अजूनपर्यंत ह्या फोनविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, त्यामुळे येणा-या सर्व बातम्यांवर विश्वास ठेवणे उचित ठरणार नाही.
हेदेखील वाचा – शाओमीच्या वेबसाइटवर आला शाओमी Mi मॅक्स फॅबलेट, १० मे ला होणार लाँच
हेदेखील वाचा – एसरने भारतात आणली नवीन प्रिडेटर सीरिज