मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पल लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन आयफोन 7 सादर करेल. मागील अनेक दिवसांपासून ह्या स्मार्टफोनविषयी अनेक खुलासे समोर आले होते आणि आता आणखी एक खुलासा समोर आला आहे. ह्या नवीन खुलास्यात असे म्हटले आहे की, अॅप्पल आयफोन 7 प्लस चा टॉप मॉडल 256GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असू शकतो. अॅप्पलच्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये 256GB अंतर्गत स्टोरेज नाही. २०१५ मध्येही सादर केलेल्या आयफोन 6S आणि 6S प्लसमध्ये 16GB, 64GB आणि 128GB असे तीन स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत.
अॅप्पल आयफोन 7 प्लसमध्ये 256GB चे अंतर्गत स्टोरेज असल्याची माहिती चीनची वेबसाइट ‘मायड्राइवर्स‘ने दिली होती. ‘मायड्रायवर्स’ नुसार, आयफोन 7 प्लस चे एक मॉडल 256GB च्या अंतर्गत स्टोरेजसह येईल.
ह्या रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला आहे की, हा 3100mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. आतापर्यंत कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अॅप्पल आपल्या स्मार्टफोन्समधील लाइटनिंग कनेक्टरला हटविण्याचा विचार करत आहे. त्याच्या जागेवर USB टाइप-C पोर्टला डिवाइसचा भाग बनवला जाईल.
तसेच त्याच्या इथर वैशिष्ट्यांमध्ये मल्टी-टच 3D टच, ड्यूल कॅमेरा सेंसर्स आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट रिकॉग्निशन टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे. ड्यूल कॅमेरा सेंसर्स आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर टेक्नॉलॉजीचाही समावेश आहे. ड्यूल कॅमेरा सेंसर्स आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर टेक्नॉलॉजीजला घेऊन ह्याआधीसुद्धा असे दावे करण्यात आले होते. अॅप्पल 3.5mm हेडफोन जॅकला आयफोनमधून हटविण्याचा विचार करत आहे. त्याच्या जागेवर कंपनी नवीन इयरफोन आणि अॅडॅप्टर सादर करेल.