अॅप्पल आयफोन 7 लाँच व्हायला अजून बराच वेळ आहे, मात्र ह्या आयफोनला घेऊन ब-याच अफवा आणि लीक्स दिवसेंदिवस पाहायला आणि ऐकायला मिळतात. तथापि ह्या स्मार्टफोनला ह्याआधीही बरेच लीक्स समोर आले आहे. पण आता नवीन व्हिडियोनुसार ह्या स्मार्टफोनची बरेच फोटोज समोर आले आहेत. ह्या फोटोमध्ये आयफोन 7 प्रत्येक बाजून दाखवला गेला आहे.
ह्या व्हिडियोमध्ये आयफोन 7 काही वेगळ्या रंगात दिसत आहे, जसे की आपण ह्या व्हिडियोमध्ये पाहू शकता. हा सिल्वर आणि स्पेस ग्रे रंगात ह्या व्हिडियोमध्ये दाखवला आहे. ह्याआधी समोर आलेल्या लीकमध्ये सांगितले गेले होते की, आयफोन 7 मध्ये 1960mAh ची बॅटरी असेल. तसेच आयफोन 6S मध्ये 1715mAh ची बॅटरी दिली आहे.ttt
हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स
हा नवीन खुलासा OnLeaks ने केला आहे. जर त्यांचा दावा खरा ठरला तर, आयफोन 7 मध्ये मागील आयफोनच्या तुलनेत 14% जास्त बॅटरी असेल. आयफोन 6S मध्ये खूपच छोटी बॅटरी देण्यात आली आहे त्यामुळे जर आयफोन 7 मध्ये मोठी बॅटरी दिली तर यूजर्सला ह्याचा खूप फायदा होईल.
हेदेखील वाचा – शाओमी रेडमी प्रो स्मार्टफोन लाँच, 4GB रॅमने सुसज्ज
हेदेखील वाचा – भारतात लाँच झाली अॅमेझॉन प्राईम सेवा