मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पल लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन आयफोन 7 लाँच करण्याच्या तयारीत आहे. सध्यातरी कंपनी आपल्या ह्या स्मार्टफोनवर काम करत आहे. आतापर्यंत आपल्या नवीन स्मार्टफोनविषयी बरीच माहिती समोर आली आहे आणि आता ह्या स्मार्टफोनविषयी एक नवीन खुलासा समोर आला आहे.
ह्यात अशी माहिती दिली आहे, अॅप्पल आयफोन 7 पुर्णपणे वॉटरप्रुफ असेल. अॅप्पलच्या नवीन पेटेंटनुसार आयफोनमध्ये सेल्फ हीलिंग एलास्टमर रबरचा उपयोग केला जाईल. जो फोनच्या बाहेर पोर्टला नुकसान होण्यापासून वाचवू शकतो. बाहेरील पोर्टमध्ये ईयरफोन जॅक आणि लाइटिंग पोर्टसुद्धा सामील आहेत.
त्याशिवाय त्यांनी असेही सांगितले आहे की, आयफोनच्या पुढील हँडसेटमध्ये 3GB रॅम, ५.५ इंचाची डिस्प्ले असू शकते. कंपनी पुढील वर्षी ४ इंचाचा आयफोन लाँच करु शकतो आणि हा आयफोन 6C नावाने येऊ शकतो.
अॅप्पल आयफोन 6Cमध्ये 5S सारखे फीचर्स असण्याचा दावा केला जात आहे. त्याचबरोबर ह्यात उत्कृष्ट फेसटाइम HD कॅमेरा, वायफाय आणि ब्लूटुथ असण्याचा दावा केला जात आहे.
KGI एनालिस्ट मिंग ची कुओने असा दावा केला आहे की, अॅप्पल 2016 मध्ये आयफोन 6C लाँच करु शकतो.