मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पलने अलीकडेच आपले दोन स्मार्टफोन्स आयफोन 6S आणि 6S प्लसला बाजारात आणले होते. आणि आता अशी बातमी मिळत आहे की, कंपनीने ह्या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत कमी केली आहे. कंपनीने आपल्या ह्या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत १६ टक्क्याने कमी केली आहे.
अॅप्पलने आयफोन 6S आणि 6S प्लसच्या 16GB, 64GB आणि 128GB मॉडल्सच्या किंमतीत घट केली आहे. आयफोन 6S आता ५२,००० ते ५५,००० रुपयात मिळत आहे. लाँचच्या वेळी आयफोन 6S च्या 16GB व्हर्जनला ६२,००० रुपयात सादर केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात अॅप्पलने आयफोन 6S आणि 6S प्लसला ६२००० ते ९२,००० दरम्यानलाँच केले होते. अमेरिका, मिडल ईस्ट, सिंगापूर आणि हाँगकाँगच्या तुलनेत भारतात कंपनीने १४ ते १६ हजारांपेक्षा जास्त किंमतीत लाँच केले होते.
अॅप्पल आयफोन 6S आणि 6S प्लस आपल्या आधीच्या मॉडलपेक्षा थोडा बारीक आणि जड आहे. ह्यात अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. ह्यात फोर्स टच फीचर आहे. हा तीन वेगवेगळ्या स्तरावर (टच, प्रेस आणि डीपर प्रेस) टचमध्ये अंतर करु शकतो. हे वैशिष्ट्य अॅप्पल स्मार्टवॉचमध्ये आधी दिल्या गेलेल्या फीचरचे पुढील व्हर्जन आहे. ह्याने टच अनुभव उत्कृष्ट होईल आणि प्रतिसाद वेळ कमी होईल, ज्याने ह्याचे अॅप्स अजून तेजीने काम करतील.
त्याचबरोबर आयफोन 6S आणि 6S प्लसमध्ये आयसाइट सेंसरसह 12 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि फेसटाइम सेंसरसह 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे.