Price Drop! लेटेस्ट iPhone 16 Pro च्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या Best ऑफर्स

Updated on 03-Jan-2025
HIGHLIGHTS

Apple चा iPhone 16 Pro भारतात अधिक परवडणारा बनला आहे.

ICICI आणि SBI कार्डधारक अतिरिक्त 4,000 रुपयांची सवलत मिळेल.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 48MP मुख्य आणि 48MP अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळेल.

जगप्रसिद्ध टेक जायंट Apple ने अलीकडेच आपली नवीनतम स्मार्टफोन सिरीज iPhone 16 लाँच केली आहे. त्यापैकी iPhone 16 Pro वर सध्या मोठा प्रमाणात डिस्काउंट ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे Apple चा iPhone 16 Pro भारतात अधिक परवडणारा बनला आहे. ज्यामुळे हा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची हीच योग्य संधी आहे. किंमतीतील कपात आणि विशेष बँक ऑफर्समुळे, iPhone 16 Pro आता Apple लव्हर्ससाठी खरेदीची खास संधी घेऊन आला आहे. जाणून घेऊयात किंमत आणि ऑफर्स-

Also Read: Price Cut! जबरदस्त Vivo T3x 5G फोनच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

iPhone 16 Pro ची किंमत

iPhone 16 Pro लाँचच्या वेळी 1,19,900 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. मात्र, iPhone 16 Pro आता 3,600 रुपयांच्या कपातीसह ही किंमत 1,16,300 रुपयांपर्यंत खाली आली आहे. एवढेच नाही तर, विशेष बँक ऑफरद्वारे अतिरिक्त बचतीचा लाभ देखील घेता येईल. ICICI आणि SBI कार्डधारक अतिरिक्त 4,000 रुपयांची सवलत मिळेल. तर, HDFC कार्डधारकांना 4,500 रुपयांच्या सवलतीसह 1,11,800 रुपयांना खरेदी करता येईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन अधिकृत साईट आणि इ-कॉमर्स साईटवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.

iPhone 16 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iPhone 16 Pro स्टायलिश पण चांगल्या बिल्डसाठी मॅट ग्लास बॅकसह टायटॅनियम फ्रेम डिझाईनसह येतो. फोनमध्ये कॉन्ट्रास्ट क्रिस्टल-क्लिअर व्हिज्युअलसह 6.3-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, हा फोन 6-कोर CPU आणि 16-कोर न्यूरल इंजिनसह A18 Pro चिपद्वारे समर्थित आहे. ही चिप स्मूथ मल्टीटास्किंग आणि उत्तम AI कॅपॅबिलिटीजसह येतो. फोन IP68 रेटेड वॉटर रेझिस्टन्स आहे. यासह हा फोन 30 मिनिटांसाठी 6 मीटर पाण्याखाली टिकून राहण्यास सक्षम आहे.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 48MP मुख्य आणि 48MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 12MP 5X टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग दरम्यान अधिक इमर्सिव्ह अनुभवासाठी हे Spatial Audio च्या समर्थनासह येते. iPhone 16 Pro च्या फ्रंट कॅमेरामध्ये 12MP लेन्स आहे. पॉवर बॅकअपसाठी, आईफोन 16 प्रो मध्ये 3,582 mAh ची बॅटरी आहे. किंमतीतील कपात आणि विशेष बँक सवलतींसह, आता iPhone 16 Pro खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :