digit zero1 awards

iPhone 15 Ultra Camera: फोनच्या कॅमेऱ्याने कॅप्चर करता येतील 3D फोटो आणि Video, अप्रतिम फोटोग्राफीचा मिळेल अनुभव

iPhone 15 Ultra Camera: फोनच्या कॅमेऱ्याने कॅप्चर करता येतील 3D फोटो आणि Video, अप्रतिम फोटोग्राफीचा मिळेल अनुभव
HIGHLIGHTS

Apple ची ही नवीन iPhone 15 सिरीज पुढील आठवड्यात 12 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर लाँच होणार

आता iPhone 15 Ultra च्या कॅमेऱ्याबाबत एक नवीन लीक रिपोर्ट समोर आला आहे.

या कॅमेरासह तुम्ही 3D फोटो आणि व्हीडिओ कॅप्चर करू शकता.

Apple च्या आगामी iPhone 15 सिरीजची प्रतीक्षा अख्ख्या टेक विश्वात सुरु आहे. त्याआधी आगामी सिरीजबद्दल अनेक लीक्स आणि तपशील पुढे येत आहेत. आता iPhone 15 Ultra च्या कॅमेऱ्याबाबत एक नवीन लीक रिपोर्ट समोर आला आहे. Appleच्या पहिल्या अल्ट्रा iPhoneचा कॅमेरा विशेष असेल. यात 3D फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्याची क्षमता असू शकते. रिपोर्टनुसार, या iPhone मधून टिपलेले फोटो आणि व्हिडिओ Apple Vision Pro मध्ये पाहता येतील. यात स्पेशियल फोटो आणि व्हिडीओजचे अनोखे फिचर मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे, जे व्हिजन प्रोच्या इमर्सिव्ह 3D कंटेंटसाठी वापरले जाऊ शकते.

Apple ची ही नवीन iPhone 15 सिरीज पुढील आठवड्यात 12 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर लाँच होत आहे. या सिरीजमध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max किंवा iPhone 15 Ultra मॉडेल सादर केले जातील. 

iphone 15

3D कॅमेरा 

असे मानले जात आहे की, Apple च्या आगामी iPhone 15 Ultra मध्ये 3D कॅमेरा मिळू शकतो. सध्या आयफोन 14 प्रो मॅक्स वाइड अँगल कॅमेरा, टेलिफोटो कॅमेरा आणि अल्ट्रा वाइड कॅमेरा, LiDAR स्कॅनर आणि एडोप्टिव्ह ट्रू टोन फ्लॅश देते. लीकनुसार, नवीन iPhone 15 Ultra मध्ये 3D कॅमेरा देखील असेल.

एका टिपस्टरने iPhone 15 Ultra च्या कॅमेर्‍याबद्दलची ही नवीन लीक चीनी सोशल मीडिया ऍप Weibo वर शेअर केली आहे. लीकनुसार, यात ऍपलचा पहिला 3D कॅमेरा असू शकतो, ज्याद्वारे वापरकर्ते लोकल ऑडिओ, फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करू शकतील. या कॅमेरासह तुम्हाला फोटोग्राफीचा उत्तम अनुभव मिळणार आहे. वापरकर्ते त्यांच्या संपूर्ण फोटो लायब्ररीमध्ये iCloud द्वारे ऍक्सेस करू शकतील आणि Apple Vision Pro हेडसेटवर त्यांना अप्रतिम तपशीलांसह बघू शकतील. 

iphone 15

आता इतर लिक्सबद्दल थोडी माहिती घेऊयात, iPhone 15 Ultra/iPhone 15 Pro Max च्या संभावित फीचर्स बद्दल बोलताना, यात 6.7 इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. Dynamic Island डिस्प्ले देखील आगामी iPhone 15 Ultra मध्ये आढळू शकतो. तसेच, हा स्मार्टफोन A17 बायोनिक चिपसेटसह येईल. यासह या मॉडेलमध्ये 1TB पर्यंत अंतर्गत स्टोरेज सपोर्ट करता येईल. हा फोन डिस्प्ले, हार्डवेअर तसेच मोठ्या बॅटरीसह येण्याची शक्यता आहे. चार्जिंगसाठी फोनमध्ये USB टाइप C थंडरबोल्ट चार्जिंग फीचर मिळू शकते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo