digit zero1 awards

iPhone 15 Series Launch: लाँचपूर्वी आगामी iPhone 15 सिरीजचे अपेक्षित कमालीचे फीचर्स आणि इतर डिटेल्स जाणून घ्या

iPhone 15 Series Launch: लाँचपूर्वी आगामी iPhone 15 सिरीजचे अपेक्षित कमालीचे फीचर्स आणि इतर डिटेल्स जाणून घ्या
HIGHLIGHTS

टेक विश्वात सर्वाधिक प्रतीक्षेत असलेली iPhone सीरिज अवघ्या काही तासांत लाँच होणार आहे.

आपण Apple च्या YouTube चॅनेलवर इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीम बघू शकता.

iPhone 15 मॉडेल्ससाठी प्री-ऑर्डरसाठी 15 सप्टेंबरच्या आधी किंवा जवळपास उपलब्ध होण्याची शक्यता

टेक विश्वात सर्वाधिक प्रतीक्षेत असलेली iPhone सीरिज अवघ्या काही तासांत लाँच होणार आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही सिरीजच्या काही अपेक्षित फीचर्ससह बद्दल माहिती देणार आहोत. सीरिजच्या रिलीजपूर्वी या फीचर्सबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. Apple आज 12 सप्टेंबर रोजी Apple पार्क, कॅलिफोर्निया येथील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max सारख्या नवीन मॉडेल्ससह विविध प्रकारांच्या उपकरणांसह रिलीज होणार आहे. 

iPhone 15 कधी रिलीज होईल? 

Apple आज म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता ऍपल पार्क, कॅलिफोर्निया येथील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये iPhone 15 सिरीज लाँच करेल. आपण Apple च्या YouTube चॅनेलवर किंवा वर दिलेल्या लिंकवर देखील लाईव्ह स्ट्रीमिंग बघू शकता. 

iPhone 15 ची अपेक्षित किंमत  

नवीन iPhone 15 मॉडेल्स 6GB RAM / 128GB व्हेरिएंटसाठी भारतात सुरुवातीची किंमत सुमारे 66,245 रुपये असेल. त्यानुसार, iPhone 15 Plus व्हेरिएंटची किंमत 74,534 रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र, या सिरींजची नक्की किमंत लाँचनंतरच कळेल. 

iPhone 15 उपलब्धता

iPhone 15 मॉडेल प्री-ऑर्डरनंतर तुमच्या जवळच्या Apple स्टोअर्सवर आणि Apple कंपनीच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असतील.

iPhone 15 चे अपेक्षित स्पेसिफिकेशन 

नवीन iPhone 15 मॉडेल्सच्या अपेक्षित स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, iPhone 15 मध्ये 6.1-इंच लांबीचा OLED पॅनेल डिस्प्ले असेल, ज्याचे रिझोल्यूशन 1170 x 2532 असू शकते. लेटेस्ट Apple iPhone 14 Pro Max मध्ये Apple iPhone 15 सीरीजमध्ये जवळपास सारखेच फीचर्स दिले जाण्याची अपेक्षा आहे. 

iphone 15 series

iPhone 15 चे डिझाईन 

या नवीन iPhone 15 मॉडेल्सच्या बिल्ड आणि डिझाइनमध्ये फारसा बदल दिसणार नाही, अशी माहिती मिळाली आहे.  या मॉडेल्समध्ये मुख्यतः कर्व फ्रेम असेल आणि Apple या वेळी चेसिससाठी स्टेनलेस स्टीलऐवजी टायटॅनियम वापरण्याची अपेक्षा आहे. बहुचर्चित डायनॅमिक आयलँड फिचर सध्याच्या फोन 14 प्रो मॉडेल्सपुरतेच मर्यादित आहे. मात्र, iPhone 15 मॉडेल्स नवीनतम फिचर डायनॅमिक आयलँड डिझाइनसह येण्याची अपेक्षा आहे. त्याबरोबरच, आगामी iPhone मॉडेल्समध्ये USB Type-C पोर्ट असणे अपेक्षित आहे. 

iPhone 15 कॅमेरा 

 iPhone 15 मध्ये तुम्हाला अल्ट्रा वाइड आणि टेलीफोटो दोन्ही कॅमेर्‍यांसह खरोखर उत्कृष्ट सुधारणा मिळणार आहे. ज्यामुळे सुधारित इमेज कॉलिटी आणि हाय रिझोल्यूशन फोटो मिळतील. नियमित iPhone मॉडेल्समध्ये लक्षणीय कॅमेरा सुधारणा मिळतेच. तुम्हाला नव्या सिरीजमध्ये 48MP मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. 

iPhone 15 मध्ये किती मोठी बॅटरी अपेक्षित आहे? 

या आगामी iPhone 15 मॉडेल्सच्या फीचर्समधील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे फोनची बॅटरी होय. TechRadar च्या तपशीलवार अहवालानुसार या स्टॅंडर्ड iPhone 15 मध्ये सुमारे 3877mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे. 

iPhone 15 ची प्री-ऑर्डरसाठी कधी उपलब्ध होणार? 

  iPhone 15 मॉडेल्ससाठी प्री-ऑर्डर पहिल्या सेलपूर्वी 15 सप्टेंबरच्या आधी किंवा जवळपास सुरु होणे, अपेक्षित आहे. त्यामुळे ते Apple इव्हेंटनंतर लगेच उपलब्ध होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तुम्ही तुमचे डिव्हाइस लवकरात लवकर मिळवण्यासाठी Apple Store किंवा वेबसाइटवर प्री बुकिंग करू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo