Apple ने 10 दिवसांपूर्वी आपली नवीन iPhone सीरीज लाँच केली आहे. आज iPhone 15 पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. iPhone 15 मालिका अनेक देशांमध्ये एक आठवड्यापूर्वी प्रीऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, ही सिरीज 22 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून भारत आणि इतर देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. नवीनतम आयफोन मॉडेल्स Apple स्टोअर्स आणि Apple च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील.
विशेष म्हणजे यंदा आयफोन 15 सीरीजचे सर्व मॉडेल्स भारतात बनवण्यात आले आहेत. म्हणजेच iPhone 15 सिरीज भारतात बनवली गेली आहे आणि कॅलिफोर्नियामध्ये डिझाइन केली आहे. चला बघुयात पहिल्या सेलमधील ऑफर्स:
Apple ने अधिकृतपणे जाहीर केले आहे की जे खरेदीदार नवीन iPhone 15 Pro आणि Pro Max खरेदी करण्यासाठी HDFC बँक कार्ड वापरतात त्यांना 6,000 रुपयांची त्वरित सूट मिळेल. iPhone 15 आणि 15 Plus साठी म्हणजेच जे नॉन-प्रो मॉडेल आहेत, त्यांवर Apple 5,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे.
त्याबरोबरच, iPhone 14 आणि 14 Plus वर 4,000 रुपये, iPhone 13 वर 3,000 रुपये आणि iPhone SE वर 2,000 रुपयांच्या सवलतीसह या ऑफर जुन्या iPhone मॉडेल्सवरही लागू आहेत.
लेटेस्ट iPhone 15 सीरिजच्या बेस व्हेरिएंटची म्हणजेच 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये इतकी आहे. तर, दुसऱ्या 256GB व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, फोनच्या 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किमंत 1,09,900 रुपये ठेवण्यात आली आहे.
iPhone 15 सिरीजच्या iPhone 15 Plus च्या बेस व्हेरिएंटची म्हणजेच 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये इतकी आहे. तर, दुसऱ्या 256GB व्हेरिएंटची किंमत 99,900 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, फोनच्या 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किमंत 1,19,900 रुपये ठेवण्यात आली आहे.
iPhone 15 सिरीजच्या iPhone 15 Pro च्या बेस व्हेरिएंटची म्हणजेच 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,34,900 रुपये इतकी आहे. तर, दुसऱ्या 256GB व्हेरिएंटची किंमत 1,44,900 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, फोनच्या 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किमंत 1,64,900 रुपये ठेवण्यात आली आहे. आता फोनच्या हाय व्हेरिएंटची म्हणजेच 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किमंत 1,84,900 रुपये इतकी आहे.
iPhone 15 सिरीजच्या iPhone 15 Pro Max च्या 256GB व्हेरिएंटची किंमत 1,59,900 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, फोनच्या 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किमंत 1,79,900 रुपये ठेवण्यात आली आहे. आता फोनच्या हाय व्हेरिएंटची म्हणजेच 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किमंत 1,99,900 रुपये इतकी आहे.