लाँच झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच iPhone 15 झाला 9 हजार रुपयांनी स्वस्त, अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही। Tech News
लेटेस्ट iPhone 15 मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याची संधी
तुम्हाला हा फोन Amazon वरून ऑर्डर करावा लागेल.
Amazon Pay ICICI बँक कार्डच्या मदतीने पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक
iPhone लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. लेटेस्ट iPhone 15 अलीकडेच लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे नवीनतम iPhone खरेदी करायचा असेल तर ग्राहकांसाठी ही अप्रतिम संधी आहे. हा फोन 79,900 रुपयांना लाँच करण्यात आला होता, परंतु हा फोन 75 हजार रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला हा फोन Amazon वरून ऑर्डर करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला हा फोन आणखी ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करता येईल. यासह लोकांना प्रीमियम फोन खरेदी करणे सोपे झाले आहे.
हे सुद्धा वाचा: 8GB रॅमसह Tecno चा सर्वात वेगवान फोन भारतात 3 जानेवारीला होणार लाँच, मिळतील Attractive फीचर्स। Tech News
iPhone 15 वरील ऑफर्स
iPhone 15 सध्या Amazon वर 74,900 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. तर बँक डिस्काउंटनंतर फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल. होय, Amazon Pay ICICI बँक कार्डच्या मदतीने पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. यासह तुम्हाला जास्तीत जास्त 3,745 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. ही सूट मिळाल्यानंतर हा फोन तुम्हाला 71,245 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Buy From Here
iPhone 15 चे मुख्य तपशील
iPhone 15 च्या महत्त्वाच्या तपशीलांबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 6.1 इंच लांबीचा डिस्प्ले आहे, जो 2000 nits ब्राइटनेससह येतो. यामुळे तुम्हाला खूप चांगली डिस्प्ले क्वालिटी मिळणार आहे. विशेष म्हणजे या फोन लोकप्रिय डायनॅमिक आयलँड टेक्नॉलॉजी सह सुसज्ज आहे. हे सामान्य नॉचपेक्षा वेगळे आहे. यावर तुम्हाला म्युझिक, चार्जिंग, नोटिफिकेशन्स इ. सर्व दिसेल.
iPhone 15च्या कॅमेरा विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा आहे. जो 100% फोकस पिक्सेलसह येतो, जो सुपर फास्ट ऑटो फोकस देखील देतो. डीफॉल्ट 24MP सेटिंगसह तुम्हाला आकर्षक छायाचित्रे मिळतील.त्याबरोबरच, iPhone 15 च्या 2x टेलीफोटो लेन्स 0.5x, 1x आणि 2x स्तर झूम देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये स्मार्ट HDR सिस्टमही देण्यात आले आहे. तसेच, पोर्ट्रेट मोडला देखील मॅन्युअल अडजस्टमेन्टची आवश्यक नाही.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile