Apple दरवर्षी सप्टेंबरमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करते, हे सर्वांना माहिती आहे. आगामी iPhone 15 सिरीजची iPhoneचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. बऱ्याच कालावधीपासून आगामी सिरीजबद्दल चर्चा, लीक्स आणि अफवा सुरु आहेत. लाँच इव्हेंटमध्ये नवीन iPhone सीरिजसोबतच अनेक उत्पादनांचे अनावरण करण्यात आले आहे. या वर्षी कंपनी iPhone 15 सीरीज आणण्याची तयारी करत आहे.
या सिरीजअंतर्गत अनेक फोन आणले जातील. काही लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये आगामी iPhone 15 सीरीजची माहिती समोर आली आहे. या फोनची लाँच डेट लीक झाली आहे. ताज्या रिपोर्टनुसार, Apple iPhone 15 सीरीज लाँच करण्यासाठी सप्टेंबर 2023 च्या तिसऱ्या आठवड्यात एक कार्यक्रम आयोजित करणार आहे.
ताज्या लीकनुसार, iPhone 15 सिरीज सप्टेंबर 2023 च्या तिसऱ्या आठवड्यात सादर केली जाईल. रिपोर्टनुसार, mobile carriers च्या कर्मचाऱ्यांना 13 सप्टेंबर रोजी सुट्टी न घेण्यास सांगण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कर्मचार्यांनी सांगितले की, या नोटीसमागील कारण म्हणजे त्या दिवशी एक मोठा लाँच इव्हेंट होण्याची शक्यता आहे. मात्र, Apple ने अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
Apple नेहमी सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात आयफोन लॉन्च इव्हेंट आयोजित करतो. म्हणूनच, सांगण्यात आलेल्या तारखेला हा लाँच इव्हेंट होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. जर iPhone 15 सीरीज 13 सप्टेंबरला लाँच झाली, तर त्याची प्री-बुकिंग 15 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, वर सांगितल्याप्रमाणे कंपनीने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
लीकनुसार, iPhone च्या आगामी सीरिजच्या चारही मॉडेल्समध्ये पंच होल कटआउट्स उपलब्ध असतील. सिरीजचा कॅमेरा सेटअप देखील अपग्रेड केला जाईल. या सिरीजमध्ये एक नवीन A17 Bionic चिप मिळण्याची शक्यता आहे. A17 बायोनिक चिप आगामी iPhone 15 Pro आणि Pro Max ला उर्जा देईल, असे देखील सांगितले जाते. फोन वेगवेगळ्या रॅम व्हेरिएंटसह येण्याची अपेक्षा आहे.
काही लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये iPhone 15 हे USB टाइप-C पोर्ट आणि थिन बेझल्ससह आणले जाईल, असे देखील सांगितले गेले आहे. मात्र, आगामी सिरीजची किंमत काय असेल, याबात अद्याप कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.