नवीनतम स्मार्टफोन सिरीज iPhone 16 सिरीज जागतिक स्तरावर लाँच
Apple ने iPhone 15, iPhone 15 Plus आणि iPhone 14 च्या किमतीत कपात जाहीर केली.
iPhone 14 आणि iPhone 15 ची किंमत तब्बल 10 हजार रुपयांनी कमी
बहुप्रतीक्षित आणि नवीनतम iPhone 16 सिरीज जागतिक स्तरावर लाँच करण्यात आली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे ही सर्व उपकरणे ॲक्शन बटण, डायनॅमिक आयलँड डिस्प्ले आणि A18 बायोनिक चिपसेट यांसारख्या नवीनतम फीचर्ससह लाँच करण्यात आले आहेत.
दरम्यान, दुसरीकडे iPhone 16 सिरीज लाँच होताच अमेरिकन टेक कंपनी Apple ने iPhone 15, iPhone 15 Plus आणि iPhone 14 च्या किमतीत कपात जाहीर केली आहे. या तिन्ही आयफोनच्या नवीन किमती वेबसाईटवर लाईव्ह झाल्या आहेत. पाहुयात नव्या किमती-
iPhones च्या किमतीत कपात
iPhone 14 आणि iPhone 15 ची किंमत तब्बल 10 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. तर, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ची किंमत 15 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे दोन्ही फोन अधिकृत वेबसाइटवरून रिमूव्ह करण्यात आले आहेत.
iPhone 15 128GB = 69,900 रुपये, iPhone 15 256GB = 79,900 रुपये आणि iPhone 15 512GB = ₹99,900 रुपये.
iPhone 15 Plus 128GB = 79,900 रुपये, iPhone 15 Plus 256GB = 89,900 रुपये आणि iPhone 15 Plus 256GB = 1,09,900 रुपये.
iPhone 15 सिरीजचे फीचर्स
iPhone 15 मध्ये 6.1-इंच लांबीचा डायनॅमिक आयलंड फिचर देण्यात आला आहे, तर iPhone 15 Plus मध्ये 6.7-इंच लांबीची स्क्रीन आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये A16 बायोनिक चिप आहे. फोटो क्लिक करण्यासाठी 48MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्याबरोबरच, पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 26 तास चालणारी बॅटरी आहे, जी USB-C पोर्टद्वारे चार्ज केली जाऊ शकते.
आता iPhone 15 प्रो आणि iPhone 15 प्रो मॅक्समधील फीचर्सबद्दल थोडक्यात बोलायचे झाल्यास, या दोघांमधील फरक फक्त स्क्रीनचा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 15 Pro मध्ये 6.1 लांबीचा आणि 15 Pro Max मध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, दोन्ही उपकरणांमध्ये A17 PRO चिप देण्यात आली आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. तुमचे स्टोरेज संपल्यास, क्लाउड स्टोरेज वापरले जाऊ शकते.
याव्यतिरिक्त, दोन्ही iPhone मध्ये ॲक्शन बटणही देण्यात आले आहे. पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची बॅटरी 26 तासांपेक्षा जास्त काळ टिकेल. या स्मार्टफोन्समध्ये Wi-Fi आणि USB टाइप-C पोर्ट सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.