iPhone 14 Series : या वेबसाइटवर उत्तम ऑफर उपलब्ध, मिळेल 5000 रुपयांचा कॅशबॅक

Updated on 15-Sep-2022
HIGHLIGHTS

iPhone 14 Series उत्तम ऑफर्ससह खरेदी करा

'या' साईट्सवर बघा आयफोनवरील उत्तम ऑफर्स

iPhone 13 सिरीज आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध

Apple ने अलीकडेच iPhone 14 सिरीज लाँच केली आहे. ज्या अंतर्गत  iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro, आणि iPhone 14 Pro Max असे चार स्मार्टफोन लाँच केले आहेत. या आयफोन्सची प्री-बुकिंग गेल्या आठवड्यातच सुरू झाली आहे. जर तुम्हाला नवीन आयफोन घ्यायचा असेल तर आयफोन 14 सीरिजसह Amazon, Flipkart आणि Croma सारख्या साइट्सवर उत्तम ऑफर्स आहेत.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Realme च्या सर्वात स्वस्त 80W चार्जिंग फोनवर 7000 ची सूट, जाणून घ्या ऑफर

iPhone 14 सिरीजवर ऑफर 'या' साईट्सवर उपलब्ध असतील

iPhone 14 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांमध्ये ब्लू, मिडनाईट, पर्पल, स्टारलाइट आणि प्रॉडक्ट रेड कलरमध्ये उपलब्ध असेल. भारतात iPhone 14 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे. 128GB स्टोरेज मॉडेल या किंमतीत उपलब्ध असेल. आता तुम्ही Amazon वरून फोन खरेदी करताना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 5,000 रुपयांचा झटपट कॅशबॅक मिळेल. तसेच, 16,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे आणि तुम्ही 3,817 रुपयांच्या EMI वर नवीन iPhone देखील खरेदी करू शकता.

iPhone 14 क्रोमा, फ्लिपकार्ट आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरवर समान ऑफरसह सूचीबद्ध आहे. फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डसह 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. तुम्हाला फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल 2022 मध्ये फोनसह सरप्राईज 'कूपन बी' मिळू शकते. Flipkart नवीन iPhone वर 22,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे.

iPhone 13 सिरीज आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध

iPhone 13 सीरीज, iPhone 12 मिनी आणि iPhone 11 फ्लिपकार्ट सेलमध्ये आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत सूचीबद्ध केले गेले आहेत. 49,990 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीत Apple iPhone 13 खरेदी करण्याची संधी देखील असेल. iPhone 13 Pro ची प्रारंभिक किंमत 89,990 रुपये किंवा त्याहून कमी असेल आणि iPhone 13 Pro Max 99,990 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :