iPhone 14 सिरीजमध्ये झालेले बदल; 48MP कॅमेर्‍यापासून ते Dynamic Island नॉचपर्यंत सर्वकाही जाणून घ्या…

Updated on 08-Sep-2022
HIGHLIGHTS

जाणून घ्या, iPhone 14 सिरीजमध्ये झालेले महत्त्वाचे बदल

Dynamic Island म्हणजे काय ?

iPhone14 सिरीजमध्ये फिजिकल सिम कार्ड नाही तर इ-सिम वापरावे लागेल.

Apple ने आपल्या ‘Far Out' इव्हेंटमध्ये चार नवीन  iPhone, तीन स्मार्टवॉच आणि एक एअरपॉड लाँच केला आहे. यावेळी Apple ने आयफोन मिनी काढून प्लस मॉडेलला नॉच केले. iPhone 7 Plus (2016) लाँच झाल्याच्या 6 वर्षांनंतर Apple ने पुन्हा प्लस मॉडेल सादर केले आहे. यावेळी iPhone 14 सीरीज अंतर्गत iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लॉन्च करण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात नवीन फोन सिरीजमध्ये कोणते बदल झाले…  

हे सुद्धा वाचा : Airtel 5G: कधी होणार लाँच ? कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध होईल सर्व्हिस ? वाचा सविस्तर…

iPhone 14 मध्ये कोणते बदल झाले:

Dynamic Island

iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max च्या नॉचमध्ये बदल करण्यात आले आहेत. 2017 नंतर प्रथमच iPhone प्रो मॉडेलच्या नॉचमध्ये बदल करण्यात आला आहे. Apple ने Apple iPhone X सोबत पहिल्यांदा नॉच डिस्प्ले दिला होता, त्यानंतर Android कंपन्यांनी या नॉचची स्टाईल कॉपी केली. iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये पिल शेप (टॅब्लेट) होल पंच कटआउट आहे, ज्याला Apple ने 'Dynamic Island' असे नाव दिले आहे. ही नॉच नोटिफिकेशननुसार मोठी किंवा लहान देखील होऊ शकते. फ्रंट कॅमेराही या नॉचमध्येच आहे. फोनवर पॉपअप दर्शविण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. याशिवाय यूजर्सना याद्वारे म्युझिक कंट्रोल आणि बॅटरी बघण्याची सुविधाही मिळते.

48 मेगापिक्सेल कॅमेरा

Apple ने iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max 48 मेगापिक्सेल कॅमेरासह सादर केला आहे. या दोन्ही फोनमध्ये कंपनीने पहिल्यांदाच एवढा मोठा कॅमेरा सेन्सर वापरला आहे. कॅमेरासह ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देखील उपलब्ध असेल. प्रो मॉडेलमध्ये तीन मागील कॅमेरे आहेत, ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेल, दुसरा 12 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आणि तिसरा लेन्स 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगलचा आहे. त्याबरोबरच,फ्रंटला 12 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. प्रो मॉडेलचा कॅमेरा फोटोनिक इंजिनद्वारे समर्थित आहे, जो लो लाइटमध्ये सर्वोत्तम फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी असल्याचा दावा करतो.

ई-सिम

 iPhone14 सिरीजसह, Apple ने फिजिकल सिम कार्डची सुट्टी केली आहे, जरी हे सध्या फक्त यूएससाठी आहे. म्हणजेच यूएसमध्ये विकल्या जाणार्‍या कोणत्याही iPhone 14 सिरीज फोनमध्ये सिम कार्ड स्लॉट नसेल. अशा परिस्थितीत सर्व फोनमध्ये ई-सिम वापरावे लागेल. त्याबरोबरच, एकाच फोनमध्ये अनेक सिमकार्ड एकाच वेळी वापरता येतील.

क्रॅश डिटेक्शन/सॅटेलाइट कम्युनिकेशन

APPLE ने नवीन iPhoneसह आपत्कालीन संपर्कासाठी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी प्रदान केली आहे. या फिचरच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीत ऍम्ब्युलन्स, पोलिस आणि लष्कराकडून सॅटेलाईटद्वारे मदत घेतली जाऊ शकते. याची सुरुवात अमेरिका आणि कॅनडामधून होत आहे. मात्र, हे फिचर सध्या भारतात उपलब्ध होणार नाही. iPhone  14 सह, हे फिचर दोन वर्षांसाठी विनामूल्य असेल आणि त्यानंतर चार्जेस द्यावे लागतील. iPhone 14 सिरीजमधील चारही iPhones मध्ये क्रॅश डिटेक्शन फिचर आहे, जे कार अपघात किंवा इतर तत्सम आपत्कालीन परिस्थितीत आपत्कालीन क्रमांक डायल करेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :