आगामी iPhone 14 सिरीजबद्दल बरेच काही आधीच ऑनलाइन लीक झाले आहे. iPhone च्या किंमतीबद्दलही अनेक अफवा आहेत. नवीन iPhone ची किंमत आयफोन 13 सिरीजपेक्षा जास्त असेल, अशी माहिती मिळाली आहे. तर डिव्हाइस त्याच जुन्या किमतींमध्ये येईल, अशाही बातम्या आहेत. आता, विश्लेषक मिंग-ची कुओ म्हणतात की, Apple गेल्या वर्षीच्या प्रो व्हेरिएंटच्या तुलनेत iPhone 14 प्रो मॉडेलच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : Brahmastra : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या चित्रपटात शाहरुखचा कॅमिओ, बघा व्हिडिओ
जरी त्यांनी आयफोन 14 सीरीजच्या किंमतीचा खुलासा केला नसला तरी, असा अंदाज लावला जात आहे की iPhones 14 Pro ची किंमत जुन्या प्रो मॉडेलपेक्षा 15 टक्क्यांपर्यंत जास्त असण्याची शक्यता आहे. iPhone 13 प्रो ची US मध्ये $999 ची सुरुवातीची किंमत आहे, तर iPhone 13 Pro Max ची किंमत $1,099 आहे. त्यामुळे, Apple 15 टक्क्यांनी किंमत वाढवण्याचा विचार करत असल्यास, iPhone 14 Pro ची किंमत $1,099 आणि मॅक्स मॉडेलची किंमत $1,199 असू शकते. याचा अर्थ फोनच्या किमतीत $100 ने वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतात $100 ची किंमत सुमारे 8,000 रुपये आहे, परंतु Apple साधारणपणे $1 ला रु.100 असे दर देते. त्यामुळे किमतीतील वाढ 10,000 रुपयांच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. भारतात त्याची किंमत iPhone 13 सिरीजपेक्षा 10,000 रुपये जास्त असू शकते. iPhone 13 Pro भारतात 1,19,900 रुपयांना उपलब्ध करण्यात आला होता, तर iPhone 13 Pro Max 1,29,900 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होता.
तर 15 टक्के वाढीसह, iPhone 14 Pro ची किंमत 1,29,900 रुपये आणि मॅक्स व्हेरिएंटची किंमत 1,39,900 रुपये असण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा की, ही सर्व केवळ अफवा आहे आणि Apple सप्टेंबर 2022 मध्ये त्याच्या किंमती उघड करेल. मात्र, कंपनीने अद्याप लाँचची तारीख जाहीर केलेली नाही. अफवांनुसार, 6 किंवा 13 सप्टेंबर रोजी iPhone 14 लाँच इव्हेंट आयोजित करण्यात येणार आहे.