Apple पुढील आठवड्यात आपली iPhone 14 सीरीज लाँच करणार आहे. iPhone 14 किमान तीन मॉडेल्समध्ये सादर केला जाऊ शकतो. iPhone 14 बाबतचा हा नवीन अहवाल चाहते आणि संभाव्य ग्राहकांना आनंदित करेल. मार्केट इंटेलिजेंस कंपनी TrendForce च्या रिपोर्टनुसार, iPhone 14 ची किंमत खूप कमी असू शकते. हा अहवाल पूर्वीच्या अहवालांच्या विरोधात आहे. विश्लेषकांना अगदी अपेक्षा आहे की, iPhone 14 चे बेस मॉडेल iPhone 13 पेक्षा स्वस्त असेल.
हे सुद्धा वाचा : अप्रतिम ऑफर ! Infinix च्या नवीन स्मार्टफोनवर 1500 रुपयांची सूट, 1 रुपयात मिळतील 1,099 रु. चे इयरबड्स
Apple iPhone 14 ची किंमत सर्वात कमी ठेवेल, त्यानंतर 14 Max, 14 Pro आणि 14 Pro Max असेल. अहवालात असे म्हटले आहे की, iPhone 14 128GB च्या बेस व्हेरिएंटची किंमत $750 म्हणजेच सुमारे 59,600 रुपये असू शकते. iPhone 13 128GB व्हेरिएंटची किंमत $799 म्हणजेच जवळपास 63,600 रुपये आहे.
अहवालानुसार, iPhone 14 मॅक्स iPhone 14 पेक्षा किमान $100 अधिक महाग असू शकतो. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर Apple iPhone 14 सीरीजमध्ये कोणतेही मिनी मॉडेल नसेल. iPhone मिनी हा लाइनअपमध्ये सर्वात परवडणारा असल्याने iPhone 14 हे या सिरीजमधील सर्वात परवडणारे मॉडेल असेल, असा अंदाज लावला जात आहे.
बाजार विश्लेषकांचा असाही दावा आहे की, iPhone 14 च्या Pro आणि Pro Max व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे $1,050 म्हणजेच अंदाजे 83,500 रुपये आणि $1,150 म्हणजेच अंदाजे 91,400 रुपये असू शकते. अहवाल योग्य असल्यास, iPhone 14 Pro आणि 14 Pro Max हे मॉडेल्स $50 ने iPhone 13 Pro आणि 13 Pro Max पेक्षा महाग असण्याची शक्यता आहे.