digit zero1 awards

तब्बल 10,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करा iPhone 14 Plus, Jio ची जबरदस्त ऑफर

तब्बल 10,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करा iPhone 14 Plus, Jio ची जबरदस्त ऑफर
HIGHLIGHTS

JioMart चा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक फेस्ट सेल सुरू

Apple iPhone 14 Plus वर ऑफर

हा फोन 10 हजार रुपयांनी स्वस्तात खरेदी करण्याची संधी

iPhone लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. Apple ने गेल्या वर्षी iPhone 14 सीरीज अंतर्गत चार नवीन मॉडेल लाँच केले आहेत ज्यात iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांचा समावेश आहे. त्यातील, iPhone 14 Plus वर उत्तम सूट मिळत आहे. ही सूट JioMart चा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक फेस्ट सेलमध्ये मिळत आहे. 

हे सुद्धा वाचा : Poco C55 Vs Infinix Note 12i: दोन्ही स्मार्टफोनच्या टॉप 5 फीचर्समध्ये जोरदार स्पर्धा

JioMart चा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक फेस्ट सेल 

तुम्हाला स्वस्तात नवीन फोन घ्यायचा असेल, तर JioMart चा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक फेस्ट सेल सुरू आहे, जो 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये काही बँक कडून 10 टक्के सवलत उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक आणि IDBI बँकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरावे लागेल.

Apple iPhone 14 Plus वर ऑफर 

Apple iPhone 14 Plus ची लाँच किंमत 89,900 रुपये आहे. परंतु 12 टक्क्यांच्या सवलतीसह ते 78,900 रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत 128 GB स्टोरेज वेरिएंटची आहे. तर, iPhone 14 Plus चा 256 GB स्टोरेज व्हेरिएंट 88,900 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे, तर त्याची मूळ किंमत 99,900 रुपये आहे. हा फोन ब्लू, मिडनाईट, पर्पल, स्टारलाईट आणि प्रॉडक्ट रेड रंगांमध्ये खरेदी करता येईल. 

स्पेसिफिकेशन्स 

iPhone 14 Plus मध्ये 6.7-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये A15 Bionic चिपसेट आणि 512 GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये 12 मेगापिक्सेलच्या प्राथमिक लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा आहे. दुसरी लेन्सही 12 मेगापिक्सल्सची आहे. समोर 12-मेगापिक्सल कॅमेरा देखील आहे. कॅमेरा HDR व्हिडिओसह 4K रेकॉर्डिंग आणि डॉल्बी व्हिजनसाठी सपोर्ट आहे.

 जिओमार्टच्या या सेलमध्ये iPhone 13 चा 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 61,490 रुपयांना उपलब्ध आहे. जर तुम्हाला हे फोन्स स्वस्तात खरेदी करायचे असतील, तर तुम्हाला घाई करावी लागेल. कारण हा सेल केवळ 26 फेब्रुवारीपर्यंत सुरु आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo