Valentine ऑफर ! iPhone 14 Plus वर मिळतेय भारी सूट, इतर फोन्स देखील स्वस्तात

Updated on 13-Feb-2023
HIGHLIGHTS

व्हॅलेंटाईन डेच्या खास निमित्त iPhone 14 सीरीजच्या फोनवर मोठी सूट

Appleच्या iVenus या थर्ड पार्टी ऑथोराइज्ड सेलरने iPhone 14 सिरीजसह व्हॅलेंटाईन ऑफरची घोषणा

इतर iPhone देखील स्वस्तात घेण्याची संधी

Apple ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 14 मालिका 79,990 रुपयांपासून सुरू केली होती. या सीरीज अंतर्गत iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लाँच करण्यात आले होते. आता व्हॅलेंटाईन डेच्या खास निमित्त या तिन्ही फोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. iPhone 14 सीरीजच्या फोनवर 43,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. चला जाणून घेऊया सर्व ऑफर्सबद्दल….

हे सुद्धा वाचा : तुमचा फोन वॉटरप्रूफ आहे की वॉटर रेझिस्टंट, तुम्हाला माहीत आहे का दोघांमधील फरक ?

व्हॅलेंटाईन ऑफर :

Appleच्या iVenus या थर्ड पार्टी ऑथोराइज्ड सेलरने iPhone 14 सिरीजसह व्हॅलेंटाईन ऑफरची घोषणा केली आहे. या सेलमध्ये iPhone 14 37,900 रुपयांच्या प्रभावी किमतीत खरेदी करता येईल. यासोबतच iVenus स्टोअरमधून 8,000 रुपये आणि HDFC बँकेकडून 4,000 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे. तर, या iPhone वर 30,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे.

 iPhone 14 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे, परंतु iVenus ऑनलाइन स्टोअरवर हा फोन 42,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो, ही जवळपास निम्मी किंमत आहे. यामध्ये स्टोअर डिस्काउंट, कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर देखील समाविष्ट आहेत. iPhone 14 Plus तुमचा 46,990 रुपयांमध्ये होऊ शकतो.

याव्यतिरिक्त, iVenus कडून iPhone 14 Plus वर 9,000 रुपयांची सूट मिळत आहे. iPhone 14 वर उपलब्ध असलेल्या सर्व ऑफरही त्यावर उपलब्ध आहेत. iPhone 14 गेल्या वर्षी लॉन्च झाला होता. हे A15 बायोनिक चिपसेटद्वारे समर्थित आहे आणि 1200 nits पीक ब्राइटनेससह 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. यासोबतच डॉल्बी व्हिजनचाही सपोर्ट आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :