Apple च्या iPhone 14 सीरीजचा लाँच रिपोर्ट समोर आला आहे. iPhone 14 सीरीजचे लॉन्चिंग 7 सप्टेंबर रोजी होईल, असा दावा केला जात आहे. मात्र, Apple ने अद्याप अधिकृतपणे याबाबत काहीही सांगितले नाही. रिपोर्टनुसार, iPhone 14 सीरीजसोबतच नवीन Macs, नवीन iPads आणि Apple Watch चे तीन मॉडेल 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या इव्हेंटमध्ये लाँच केले जाऊ शकतात. अस्थिर अर्थव्यवस्थेच्या दरम्यान, Apple इतर कंपन्यांच्या तुलनेत स्मार्टफोन बाजारात चांगली कामगिरी करत आहे. ऍपलने गेल्या तिमाहीत इतर ब्रँड्सला मागे टाकले आहे.
हे सुद्धा वाचा : Raksha Bandhan Week 1 Collection: फ्लॉप होणार का अक्षय कुमारचा चित्रपट? वाचा सविस्तर
एका नवीन रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की Apple iPhone 14 सीरीजच्या प्रो मॉडेलची किंमत पूर्वीपेक्षा जास्त असेल. Wedbush विश्लेषकांच्या अहवालानुसार, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max च्या किमतीत iPhone 13 सिरीजच्या Pro मॉडेलच्या तुलनेत $100 म्हणजेच जवळपास 8,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची विक्री नियमित मॉडेलपेक्षा जास्त असेल, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेत अनुक्रमे 1,19,900 रुपये आणि 1,29,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आले होते.
iPhone 14 Pro मॉडेलमध्ये 6 GB पर्यंत LPDDR5 रॅम उपलब्ध असू शकते. iPhone 14 Max सह 6 GB LPDDR4X रॅम अपेक्षित आहे. ऍप्पलचा यंदाचा कार्यक्रमही ऑनलाइन होण्याची शक्यता आहे. ऍप्पलने या इव्हेंटची माहिती दिलेली नाही, पण साधारणपणे ऍप्पलचा iPhone लाँच करण्याचा कार्यक्रम सप्टेंबरमध्येच होतो. या वर्षी जूनमध्ये Apple ने iOS 16, iPadOS 16, watchOS 9 आणि macOS Ventura ची घोषणा केली.