Apple पुढील महिन्यात iPhone 14 सिरीज लाँच करण्यासाठी सज्ज झाला आहे. लाँचअगोदर, Appleच्या घोषणांबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. ऍपल आपल्या इव्हेंट दरम्यान काय लाँच करणार ? याबाबत बरेच अहवाल पुढे आलेले आहेत. आता कंपनीने 7 सप्टेंबर रोजी होणार्या फार आऊट इव्हेंटची पुष्टी करण्यासाठी मीडिया इनविट पाठवली आहेत. हा एक वैयक्तिक कार्यक्रम असेल जो क्युपर्टिनो येथील Appleच्या मुख्यालयातील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आयोजित केला जाईल. कंपनी आगामी इव्हेंटमध्ये iPhone 14 सीरीज आणि Apple Watch 8 सीरीज लाँच करण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : JIO चे स्वस्त किमतीत येणारे डेटा प्लॅन्स, 15 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅनमध्ये 12GB पर्यंत डेटा मिळेल
iPhone 14 सिरीज iPhone 14, iPhone 14 मॅक्स, iPhone 14 प्रो आणि iPhone 14 प्रो मॅक्स या चार मॉडेलमध्ये येईल. अफवांनुसार, या वर्षी फक्त iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ला नवीन Apple A16 Bionic चिप मिळेणार आहे.
मात्र, यावर्षी सर्वात मोठा बदल iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल्सच्या डिझाइनमध्ये करण्यात आला आहे. दोन्ही प्रो मॉडेल्समध्ये 48MP वाइड-एंगल लेन्स आणि ऍडवान्सड A16 चिपसेट व्यतिरिक्त डिस्प्लेला नॉचऐवजी पिल-आकाराचा कट-आउट मिळेल. नेहमीच्या iPhone 14 मध्ये iPhone 13 प्रमाणे 12 मेगापिक्सेलचा समान सेन्सर दिसू शकतो.
Apple दरवर्षी iPhones सोबत Apple Watch लाँच करतो. या वर्षी कंपनी Apple Watch Series 8 लाँच करणार आहे. ऍपल वॉच सिरीज 8 अनेक नवीन हेल्थ फिचरसह येईल. त्याबरोबरच काही अहवालांमध्ये असेही नमूद केले आहे की, स्मार्टवॉच नवीन डिझाइनसह येणार आहे.
Apple Watch Pro मोठ्या डिस्प्लेसह येईल, जो सध्याच्या आकारापेक्षा सुमारे 7 टक्के मोठा आहे. Apple Watch Pro टायटॅनियम डिझाइनमध्ये येण्याची अपेक्षा आहे.