iPhone 14 च्या बेस व्हेरिएंटची किंमत लीक, iPhone 13 सिरीजपेक्षा असणार स्वस्त ?

Updated on 05-Aug-2022
HIGHLIGHTS

iPhone 14 च्या बेस व्हेरिएंटच्या किमतीचा खुलासा

iPhone 14 ची लॉन्चिंग पुढील महिन्यात होणार

iPhone 14 चे प्रो मॉडेल नवीन चिपसेटसह लाँच केले जाईल

Apple चा नवीन iPhone म्हणजेच iPhone 14 चे लॉन्चिंग पुढील महिन्यात होणार आहे. आतापर्यंत iPhone 14 च्या फीचर्सबद्दल लीक रिपोर्ट्स समोर येत होत्या, पण आता पहिल्यांदाच iPhone 14 च्या किमतीची माहिती समोर आली आहे. कोरियाच्या टिपस्टर लँडस्कने iPhone 14 च्या किंमतीबद्दल माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! नवीन Realme स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, सेल आज दुपारी 12 वाजता सुरू होणार

लीक झालेल्या रिपोर्टनुसार, iPhone 14 ची सुरुवातीची किंमत $799 म्हणजेच जवळपास 63,395 रुपये असेल. असेही वृत्त आहे की, यावेळी फक्त iPhone 14 चे प्रो मॉडेल नवीन चिपसेटसह लाँच केले जाईल. इतर मॉडेल्स देखील A15 बायोनिक चिपसेटसह लाँच होतील.

प्रख्यात टेक रिपोर्टर डॅन इव्हस यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या अहवालात दावा केला होता की, iPhone 14 ची किंमत iPhone 13 सिरीजपेक्षा $100 अधिक असेल. याचाच अर्थ iPhone 14 ची सुरुवातीची किंमत $899 म्हणजेच जवळपास 71,232 रुपये असेल. दरम्यान, iPhone 14 Pro ची किंमत $1,099 म्हणजेच जवळपास 87,191 रुपये आणि टॉप मॉडेल iPhone 14 Pro Max ची किंमत $1,199 म्हणजेच जवळपास 95,131 रुपये असेल.

iPhone 14 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

iPhone 14 मध्ये 6.1-इंच स्क्रीन आणि 3279mAh बॅटरी मिळेल. याशिवाय iPhone 14 सीरीजमध्ये Appleचा A15 Bionic प्रोसेसर मिळेल. त्याबरोबरच, Apple चा iPhone 14 Pro Max मोठ्या कॅमेरा मॉड्यूलसह ​​बाजारात आणला जाईल, अशीही माहिती मिळाली आहे. iPhone 14 आणि iPhone 14 Pro 6.1-इंच पॅनेलसह लॉन्च करण्याचे दावे देखील केले जात आहेत. तर iPhone 14 Plus आणि iPhone 14 Pro Max 6.7-इंच पॅनेलसह लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :