Huge Price Drop! iPhone 15 लाँच होताच स्वस्त झाले जुने मॉडेल्स, तब्बल 18 हजार रुपयांनी किंमत कमी

Updated on 13-Sep-2023
HIGHLIGHTS

नवीन सिरीज लाँच झाल्यानंतर iPhone 14 आणि iPhone 14+ च्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी कपात

Apple ने या दोन्ही फोनची किंमत तब्बल 10,000 रुपयांनी कमी केली आहे.

HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 8,000 रुपयांचा झटपट कॅशबॅक

टेक विश्वात आज जिकडे तिकडे फक्त Apple इव्हेंटची चर्चा सुरु आहे. अखेर भारतात लेटेस्ट आणि बहुप्रतीक्षित iPhone 15 सीरीज लाँच झाली आहे. Apple ने लेटेस्ट iPhones 12 सप्टेंबर रोजी आयोजित Apple Wonderlust कार्यक्रमात सादर केले आहेत. नवीन सिरीज लाँच झाल्यानंतर iPhone 14 आणि iPhone 14+ च्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी कपात झाली आहे.  

iPhone 14 आणि  iPhone 14 Plus ची नवी किंमत

मागील वर्षी Apple ने सप्टेंबरमध्ये iPhone 14 आणि iPhone Plus अनुक्रमे 79,900 रुपये आणि 89,900 रुपये या किमतीत लाँच केले होते. आता Apple ने या दोन्ही फोनची किंमत तब्बल 10,000 रुपयांनी कमी केली आहे. त्यानंतर, आता iPhone 14 आता Apple च्या साइटवर 69,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सूचीबद्ध आहे. तर, त्याचे 256 GB मॉडेल 79,900 रुपयांच्या किंमतीला आणि 512 GB मॉडेल 99,900 रुपयांच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकते. 

त्याबरोबरच, iPhone 14 Plus च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 79,990 रुपये, 256GB व्हेरिएंटची किंमत 89,990 रुपये आणि 512 GB ची किंमत 1,09,990 रुपये इतकी झाली आहे. याशिवाय, तुम्हाला यासह बँक ऑफर्सदेखील मिळणार आहेत. तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 8,000 रुपयांचा झटपट कॅशबॅक मिळेल. 

iPhone 14 आणि  iPhone 14 Plus

iPhone 14 मध्ये 6.1-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, जो सुपर रेटिना XDR आहे. या डिस्प्लेसह 60Hz रिफ्रेश रेट आहे, तर, प्रो मॉडेल 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसह येतो. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये दोन्ही लेन्स 12 मेगापिक्सेल आहेत. सेल्फीसाठी 12 मेगापिक्सेल कॅमेरा देखील उपलब्ध आहे.

iPhone 13 च्या किमतीत घट

iPhone 13 ची किंमत आता 59,900 रुपये झाली आहे. हा फोन 79,900 रुपये किमतीत लाँच करण्यात आला होता. हा फोन पिंक, ब्लू, मिडनाईट, स्टारलाईट आणि प्रॉडक्ट रेड कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :