iPhone 14 लाँच होण्यापूर्वी iPhone 13 Pro मॉडेल झाला 30 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या अप्रतिम ऑफर

iPhone 14 लाँच होण्यापूर्वी iPhone 13 Pro मॉडेल झाला 30 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या अप्रतिम ऑफर
HIGHLIGHTS

iPhone 13 Pro Max 30 हजारांनी स्वस्त

फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळतेय बम्पर सवलत

अप्रतिम ऑफरबद्दल सविस्तर माहिती घ्या

FLIPKART वर बंपर सेल सुरू आहे. सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोनही खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर iPhoneवर बंपर डिस्काउंट आहे. यावर यूजर्सना अप्रतिम ऑफर्स दिल्या जात आहेत. गॅजेट्सपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत, प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला बंपर सूट मिळत आहे. iPhone 13 Pro Max हा देखील असाच एक स्मार्टफोन आहे ज्यावर तुम्हाला प्रचंड सूट मिळत आहे. 

हे सुद्धा वाचा : 1.8-इंच AMOLED कॉस्मिक डिस्प्ले आणि ब्लूटूथ कॉलिंगसह Fitshot Crystal लाँच, जाणून घ्या किंमत 

iPhone 14 लाँचिंग लवकरच होणार आहे. iPhone 13 Pro Max 128GB व्हेरिएंटची किंमत 1,29,900 आहे आणि तुम्ही 8% डिस्काउंटनंतर 1,18,990 रुपयांमध्ये फोन खरेदी करू शकता. ही डिस्काउंट ऑफर फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय अनेक क्रेडिट कार्ड ऑफरही आहेत. म्हणजेच तुम्हाला SBI क्रेडिट कार्ड पेमेंटवर 10% पर्यंत सूट मिळवता येईल.

तुम्ही SBI क्रेडिट कार्डने EMI व्यवहार केले तरीही तुम्हाला 10% ची सूट मिळेल. यासोबतच यावर एक्सचेंज ऑफरही सुरू आहे. हा फोन एक्स्चेंज ऑफरमध्ये खरेदी केल्यास तुम्हाला तब्बल 19 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती नीट असायला हवी.

iPhone 13 Pro Max स्पेसिफिकेशन्स 

तुम्हाला यात 6.7 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. तसेच, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. iPhone 13 Pro Max मध्ये A15 बायोनिक चिप प्रोसेसर देण्यात आला आहे. हा ड्युअल सिम सपोर्ट फोन आहे. कोणत्याही फोनवर एवढी मोठी सूट येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तुम्ही आज ऑर्डर केल्यास ते उद्या तुमच्या पत्त्यावर पोहोचवले जाईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo