digit zero1 awards

80 हजारांचा ‘हा’ iPhone मिळतोय 41,499 रुपयांना, बघा कुठे मिळतेय आकर्षक ऑफर ?

80 हजारांचा ‘हा’ iPhone मिळतोय 41,499 रुपयांना, बघा कुठे मिळतेय आकर्षक ऑफर ?
HIGHLIGHTS

iPhone 13 फक्त 41499 रुपयांना खरेदी करा.

Amazon वर iPhone 13 स्वस्तात उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफरसह प्रचंड सवलत मिळवा.

Amazon ने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा एक जबरदस्त ऑफर आणली आहे. Apple iPhone 13 सध्या ई-कॉमर्स वेबसाइटवर ऑफरसह उपलब्ध आहे. iPhone 13 ची MRP 79,999 रुपये आहे आणि फोन 2021 मध्ये लाँच झाला होता. हे उपकरण वेबसाइटवर 22% सवलतीसह उपलब्ध आहे. चला तर मग ऑफरबद्दल अधिक माहिती घेऊयात…

हे सुद्धा वाचा : Solar Mobile charger : विजेविना चार्ज होणार फोन! आजच खरेदी करा एमर्जन्सी किट, किंमत फक्त 200 रुपये

iPhone 13 जो 79,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. डिव्हाइस 22% सवलतीसह उपलब्ध आहे आणि आता त्याची किंमत फक्त 61,999 रुपये आहे. Amazon एक भारी एक्सचेंज ऑफर देखील देत आहे, ज्याद्वारे तुम्ही फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.

Amazon वर iPhone 13 खरेदी करताना तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 20,550 रुपये अतिरिक्त सूट मिळू शकते. मात्र, लक्षात ठेवा की एक्सचेंज सवलत तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असते. जर तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून संपूर्ण एक्सचेंज रक्कम मिळाली, तर तुम्ही फक्त 41,499 रुपयांमध्ये iPhone 13 (128GB) स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Apple iPhone 13 128GB स्टोरेजसह येतो. स्मार्टफोनमध्ये 6.1-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस 12MP + 12MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि समोर 12MP सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन A15 बायोनिक चिप प्रोसेसरवर चालतो.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo