iPhone 14 आणि iPhone 13 च्या किमतीत मोठी घट, किती स्वस्तात खरेदी करता येतील दोन्ही फोन ?

iPhone 14 आणि iPhone 13 च्या किमतीत मोठी घट, किती स्वस्तात खरेदी करता येतील दोन्ही फोन ?
HIGHLIGHTS

iPhone 14 आणि iPhone 13 सध्या Flipkart वर स्वस्तात उपलब्ध

या दोन्ही स्मार्टफोनवर भारी बचत करू शकता.

चला तर बघुयात दोन्ही फोन्सवरील उपलब्ध ऑफर्स

iPhone 14 लाँच होताच iPhone 13 च्या किमतीत मोठी कपात झाली. iPhone 14 लाँच झाल्यानंतर तुम्ही iPhone 13 अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकता. मात्र, आता तुम्हाला आज फ्लिपकार्टवर iPhone 14 आणि iPhone 13 या दोन्ही फोनवर सुमारे 37000 रुपये वाचवण्याची उत्तम संधी मिळत आहे. फ्लिपकार्टवर हे दोन्ही फोन अगदी कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

 iPhone 14 च्या किमतीत घट 

iPhone 14 च्या 128Gb मॉडेलची किंमत Flipkart वर 79,900 रुपये आहे. यावर 9% सूट देऊन तुम्ही ते फक्त 71,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्हाला सुमारे 7,901 रुपयांची थेट सूट मिळतेय. याव्यतिरिक्त, या फोनवर तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. मात्र, हे लक्षात घ्या की संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळण्यासाठी तुमचा जुना किंवा विद्यमान फोन उत्तम स्थितीत हवा. या ऑफरचा संपूर्ण लाभ मिळाल्यास फोन फक्त 41,999 रुपयांमध्ये तुमचा होईल. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फ्लिपकार्टला भेट द्या. 

Flipkart वर iPhone 13 च्या किमतीत मोठी घसरण

तुम्हाला iPhone 13चे 128 स्टोरेज मॉडेल खरेदी करायचे असेल तर, तुम्ही ते 11% सवलतीसह 69,900 रुपयांऐवजी 61,999 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. तुम्हाला या फोनवर तब्बल 30,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरदेखील मिळत आहे. मात्र,  हे लक्षात घ्या की संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळण्यासाठी तुमचा जुना किंवा विद्यमान फोन उत्तम स्थितीत हवा. या सर्व ऑफर्ससह हा फोन केवळ 31,999 रुपयांमध्ये तुमचा होणार आहे. 

एवढेच नाही तर तुम्हाला दोन्ही फोनवर फ्लिपकार्टवर बँक ऑफर्सदेखील मिळत आहेत. तुम्ही बँक ऑफर्सचा पुरेपूर लाभ घेण्यात  झालात, तर तुम्ही हे दोन्ही फोन अगदी तुमच्या बजेट किमतीत खरेदी करू शकता. सर्व ऑफर्सचे तपशील सखोल जाणून घेण्यासाठी फ्लिपकार्टला भेट द्या. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo