त्वरा करा ! लवकरच बंद होणार ‘हा’ लोकप्रिय iPhone मॉडेल, मर्यादित स्टॉक उपलब्ध

त्वरा करा ! लवकरच बंद होणार ‘हा’ लोकप्रिय iPhone मॉडेल, मर्यादित स्टॉक उपलब्ध
HIGHLIGHTS

Apple Store वर iPhone 12 बंद करण्यात आला आहे.

हे मॉडेल Apple च्या अधिकृत भागीदार स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकतात.

iPhone 12 चा मर्यादित स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Apple कडून आगामी सिरीज iPhone 15 लाँच करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान एक बातमी पुढे येत आहे की, Apple आपला तीन वर्ष जुना आणि लोकप्रिय iPhone मॉडल बंद करत आहे. म्हणजेच, Apple कडून iPhone 15 लाँचसह iPhone 12 बंद केला जाण्याची शक्यता आहे. तर, Apple चे इतर iPhones जसे iPhone 13 आणि iPhone 14 स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात केली जाऊ शकते. 

iPhone 12 मर्यादित स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध 

iPhone लव्हर्स ! जर तुम्ही iPhone 12 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. कारण Apple Store वर iPhone 12  मॉडल बंद केला गेला आहे. परंतु हे मॉडेल Apple च्या अधिकृत भागीदार स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकतात. यामध्ये देखील iPhone 12 चा मर्यादित स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला हा फोन खरेदी करण्यासाठी घाई करावी लागेल. मिळालेल्या माहितीनुसार, Apple ने iPhone 12 चे उत्पादन आधीच बंद केले होते. पण, iPhone 12 सध्या काही नूतनीकृत स्टोअर्स आणि निवडक डीलर स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

पुढील iPhone मॉडेल्स बंद होण्याची शक्यता 

Apple कडून iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max बंद केले जाऊ शकतात, कारण Apple गेल्या काही वर्षांपासून एक वर्ष जुने Pro आणि Pro Max मॉडेल्स बंद करत आहे. यासोबतच iPhone 13 Mini आणि iPhone 14 Plus देखील बंद केले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळाली आहे.

सध्या विक्रीसाठी उपलब्ध असणारे iPhones 

सध्या iPhone SE 2022, iPhone 12, iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone Pro आणि iPhone Pro Max Apple Store वरून विकले जात आहेत. अशाप्रकारे तुम्ही iPhones मॉडेल्स Apple Store वरून खरेदी करू शकता. याशिवाय, ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरून देखील हे iPhone ऑफर्ससह खरेदी करू शकता. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo