digit zero1 awards

iPhone 12 at Huge Discount: आगामी सीरिजच्या लाँचपूर्वी लोकप्रिय iPhoneच्या किमतीत घट, बघा ऑफर

iPhone 12 at Huge Discount: आगामी सीरिजच्या लाँचपूर्वी लोकप्रिय iPhoneच्या किमतीत घट, बघा ऑफर
HIGHLIGHTS

नवीन iPhone च्या आगमनापूर्वी जुन्या फोन्सवर काही सवलती आणि ऑफरद्वारे किंमती कमी केल्या जातात.

iPhone 15 लाँच होण्यापूर्वी iPhone 12 च्या किंमतीत काहीशी घसरण दिसून येत आहे.

फोनवर HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास तुम्हाला 2000 रुपयांची सूट

दरवर्षी Apple भारतीय बाजारपेठेव्यतिरिक्त जागतिक बाजारपेठेत आपले नवीनतम iPhone सिरीज लाँच करते. खरं तर, Apple 12 सप्टेंबरला आपला वंडरलस्ट इव्हेंट आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये iPhone 15 सीरीज लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आगामी iPhone 15 ultra चा कॅमेरा अतिशय विशेष असणार आहे. दरवर्षीप्रमाणे, नवीन iPhone च्या आगमनापूर्वी जुन्या फोन्सवर काही सवलती आणि ऑफरद्वारे किंमती कमी केल्या जातात. त्यानंतर काही जुने आयफोन ग्राहकांना स्वस्तात खरेदीसाठी उपलब्ध होतात. 

iPhone 12 च्या किमतीत घट 

असेच काहीसे चित्र यावेळीही म्हणजे iPhone 15 लाँच होण्यापूर्वी बघायला मिळत आहे. यावेळी iPhone 12 च्या किंमतीत काहीशी घसरण दिसून येत आहे. मात्र लक्षात घ्या की, ही किंमत कमी कंपनीकडून नाही तर ई-कॉमर्स साइटवर दिसत होत आहे. तुम्हाला iPhone 12 Amazon वरून स्वस्तात खरेदी करता येणार आहे. 

iphone 12

iPhone 12 वरील उपलब्ध ऑफर्स 

तुम्हाला iPhone 12 खरेदी करायचा असेल तर,  iPhone 12 सध्या Amazon India वर 13% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. सध्या Amazon India वर 51,990 रुपयांमध्ये 64GB स्टोरेज व्हेरिएंट सूचिबद्ध आहे. त्याची मूळ किंमत साधारणपणे 59,990 रुपये आहे. म्हणजेच त्याच्या किमतीत जवळपास 7,910 रुपयांची सूट मिळत आहे. जर आपण iPhone 12 बँक ऑफरबद्दल बोललो, तर फोनवर HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास तुम्हाला 2000 रुपयांची सूट मिळेल. यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI पर्याय देखील मिळणार आहे. वरील सर्व सवलतींनंतर, फोन अतिशय स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो.

एवढेच नाही तर, या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आले आहेत. या ऑफर अंतर्गत तुम्ही 32,700 रुपयांपर्यंत बचत करू शकता. मात्र, तुम्ही Amazon India वर जाऊन तुमच्या क्षेत्राचा पिन कोड टाकून तपासू शकता, त्यानंतर तुम्हाला ही सूट मिळेल की नाही हे कळेल. लक्षात घ्या की, एक्सचेंजसाठी तुमचा जुना किंवा विद्यमान स्मार्टफोन उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे. 

iPhone 12 चे मुख्य तपशील 

iPhone 12 मध्ये 6.1 इंच लांबीचा OLED डिस्प्ले मिळत आहे. हा स्मार्टफोन Apple च्या A14 Bionic चिप वर चालतो. याशिवाय, यात iOS 17 चे अपडेट देखील मिळणार आहे. मात्र, याशिवाय इतरही अनेक अपडेट मिळू शकतात. iPhone 12 हा 5G क्षमतेसह सुसज्ज स्मार्टफोन आहे. फोनमध्ये 12MP ड्युअल कॅमेरा सिस्टम देण्यात आला आहे. फोनसह अप्रतिम बॅटरी लाईफ मिळत आहे, 2815mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 30 मिनिटांत 50% चार्ज होऊ शकते. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo