IPHONE 11 PRO VS IPHONE XS: भारतीय किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स मधील तुलना

IPHONE 11 PRO VS IPHONE XS: भारतीय किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स मधील तुलना

Apple त्यांची iPhone 2019 ची लाइनअप लॉन्च केली आहे, हे फोन्स जागतिक बाजारात सादर केले गेले आहेत. ऍप्पलने त्यांचे iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मोबाईल फोन्स लॉन्च केले आहेत, या फोन्स मध्ये चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी आणि नवीन तसेच प्रगत प्रोसेसर मिळाला आहे. आज आम्ही या मोबाईल फोनची आणि गेल्यावर्षी आलेल्या iPhone XS सोबत तुलना करणार आहोत, तसेच हि दोन्ही ऍप्पल फोन्स एकमेकांपासून किती वेगळे आहेत याचा अंदाज लावणार आहोत.  

ऍप्पलने इतर काही डिवाइस पण या इवेंट मध्ये लॉन्च केले आहेत. यात Apple Watch Series 5 आहे, तसेच Apple Arcade आहे, त्याचप्रमाणे Apple TV+ पण सादर केली गेली आहे. यांच्याबद्दल फक्त माहितीच समोर आली नाही तर या फोन्सची भारतीय किंमत पण समोर आली आहे. यांची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन पण समोर आले आहेत. चला जाणून घेऊया iPhone 11 Pro आणि iPhone XS मधील मोठा फरक आणि कोणता डिवाइस आहे चांगला.  

APPLE IPHONE 11 PRO VS IPHONE XS ची भारतीय किंमत  

Apple iPhone 11 Pro बद्दल बोलायचे झाले तर याच्या सर्व वेरीएंटच्या किंमतींबद्दल माहिती अजूनतरी समोर आली नाही. पण इतके जरुर समोर आले आहे कि या मोबाईल फोनची किंमत Rs 99,900 पासून सुरु होत आहे. हा डिवाइस तुम्ही 64GB, 256GB आणि 512GB मॉडेल मध्ये घेऊ शकता. अशीच किंमत iPhone XS ची पण आहे. विशेष म्हणजे या मोबाईल फोनचा 64GB मॉडेल तुम्ही फक्त Rs 99,900 मध्ये विकत घेऊ शकता, हा गेल्यावर्षी लॉन्च केला गेला होता. तसेच याच्या 512GB मॉडेलची किंमत जवळपास Rs 1,34,900 पर्यंत जाते.  

डिस्प्ले आणि डिजाईन

Apple iPhone 11 Pro मोबाईल फोन बद्दल बोलायचे तर हा मोबाईल फोन एका 5.8-इंचाच्या सुपर Retina XDR डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे, हा एक OLED पॅनल आहे. कंपनीने 3D टच या डिवाइस मधून काढून टाकला आहे. डिजाईन इत्यादी बद्दल बोलायचे तर जर तुम्ही हे दोन्ही फोन्स समोरून बघितले तर तुम्हाला वेगवेगळे डायमेंशन दिसतील. iPhone 11 Pro मध्ये तुम्हाला एक नॉच असलेली स्क्रीन मिळत आहे. सर्वात मोठा बदल तुम्हाला फक्त कॅमेऱ्याच्या प्लेसिंग आणि याच्या डिजाईन मध्ये दिसेल.  

IPHONE 11 PRO स्पेसिफिकेशन्स

5.8 इंचाचा डिस्प्ले असलेला iPhone 11 प्रो iPhone XS चा उत्तराधिकारी आहे. दुसरीकडे iPhone 11 प्रो मॅक्स, 6.5-इंचाच्या डिस्प्ले सह येतो आणि हा iPhone XS Max चा उत्तराधिकारी आहे. दोन्ही एका नवीन सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले सह येतात, ज्यात 1,200 निट्स ब्राइटनेस आहे. स्क्रीन 15 टक्के जास्त प्रकाशित होते. आयफोन वर लोकल ऑडियो, डॉल्बी एटमोस, डॉल्बी विजन एचडीआर 10 सारख्या सुविधा आहेत.

नवीन iPhone 11 प्रो आणि प्रो मॅक्स ट्रिपल रियर कॅमेऱ्यांसह येतो. सर्व 12-मेगापिक्सलचे सेंसर आहेत, ज्यात एक वाइड-अँगल, एक अल्ट्रा-वाइड-अँगल आणि टेलीफोटो लेंस आहे. फ्रंटला iPhone 12 सारखाच 12 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल ज्यात सर्व सारखेच फीचर्स असतील. Apple म्हणते, iPhone 11 प्रो, iPhone XS च्या तुलनेत 4 तास जास्त बॅटरीलाईफ देईल, तर iPhone 11 Pro Max iPhone XS Max च्या तुलनेत 5 तास जास्त बॅटरीलाईफ देईल. Apple बॉक्स मध्ये एक 18W फास्ट चार्जर पण देणार आहे.

IPHONE XS स्पेसिफिकेशन्स

iPhone XS मध्ये 5.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे जो OLED सुपर रेटिना डिस्प्ले आहे आणि HDR10 सपोर्ट सह येतो. डिवाइस स्टेनलेस स्टील पासून बनवण्यात आला आहे आणि हा 3D टच सपोर्ट सह येतो.  

फोटोग्राफी डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर iPhone XS मध्ये 12 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात एक वाइड-अँगल लेंस आहे जी f/1.8 अपर्चर सह येते तर दुसरी टेलीफोटो लेंस आहे जी f/2.4 अपर्चर सह येते. कॅमेऱ्यामध्ये जीरो शटर लॅग फीचर आणि स्मार्ट HDR मोड फीचर आहे. डिवाइसच्या फ्रंटला 7 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचे अपर्चर f/2.2 आहे. नेहमीप्रमाणे हे नवीन आईफोन्स पण आपल्या चांगल्या कॅमेरा सेटअप सह बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन्सच्या लिस्ट मध्ये समाविष्ट होतात. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo