भारतीय स्मार्टफोन निर्माता Intex टेक्नोलॉजी ने आपला UDAY स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. हा 4G VoLTE स्मार्टफोन आहे आणि यात एक फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. Intex च्या या स्मार्टफोन ची किंमत Rs. 7,999 आहे आणि या डिवाइस वर Jio Rs. 2,200 ची कॅशबॅक ऑफर पण देत आहेत.
Intex UDAY स्मार्टफोन एंड्राइड 7.0 नौगट वर चालतो. हा डिवाइस डुअल सिम सपोर्ट करतो. Intex UDAY मध्ये 5.2 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 1280 x 720 पिक्सल आहे. त्याचबरोबर डिवाइस मध्ये 1.3GHz क्वाड कोर मीडियाटेक प्रोसेसर आहे आणि या डिवाइस मध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे, या डिवाइस ची स्टोरेज माइक्रो SD कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येते.
ऑप्टिक्स पाहता या स्मार्टफोन मध्ये 13MP चा प्राइमरी कॅमेरा आहे जो LED फ्लॅश सह येतो, त्याचबरोबर सेल्फी साठी हा डिवाइस 5MP चा फ्रंट कॅमेरा ऑफर करतो आणि हा फ्रंट कॅमेरा पण LED सह सादर करण्यात आला आहे. Intex UDAY स्मार्टफोन 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ 4.2, GPS + GLONASS ला सपोर्ट करतो आणि यात 2800mAh ची बॅटरी आहे.
Intex UDAY स्मार्टफोन ची खासियत म्हणजे या डिवाइस मध्ये DataBack नावाचा अॅप आहे. हा अॅप यूजर्सना प्रत्येक महिन्याला 500MB पर्यंत फ्री डेटा ऑफर करतो आणि यूजर्स यातून अजूनही डेटा कमवु शकतात. या स्मार्टफोन मध्ये इतर प्रीलोडेड अॅप्लिकेशन पण आहेत ज्यात, प्राइम वीडियो, स्विफ्टकी कीबोर्ड आणि MiFon सिक्योरिटी यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन तीन कलर वेरिएंट्स ब्लू, शॅम्पेन आणि ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.