फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Intex Staari 10 स्मार्टफोन
Intex डिवाइस सोबत एक वर्षाची स्क्रीन रिप्लेसमेंट वारंटी पण देत आहे, या अंतर्गत जर तुमच्या डिवाइस ची स्क्रीन फुटली तर तुम्ही ती कोणत्याही चार्ज विना रिप्लेस करू शकता.
Intex ने बुधवारी आपला पहिला अनब्रेकेबल स्मार्टफोन Intex Staari 10 लॉन्च केला आहे, डिवाइस च्या फ्रंटला शॅटरप्रुफ ग्लास आहे. Staari 10 स्मार्टफोन ची किंमत 5,999 रूपये आहे आणि हा डिवाइस स्नॅपडील वर उपलब्ध होईल. Intex डिवाइस सोबत एक वर्षाची स्क्रीन रिप्लेसमेंट वारंटी पण देत आहे, या अंतर्गत जर तुमच्या डिवाइस ची स्क्रीन फुटली तर तुम्ही ती कोणत्याही चार्ज विना रिप्लेस करू शकता. हा डिवाइस Reliance Jio च्या इंस्टेंट कॅशबॅक ऑफर चा भाग आहे.
स्पेसिफिकेशन्स
डिवाइस च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे तर या स्मार्टफोन मध्ये 5.2 इंचाचा HD IPS डिस्प्ले आहे ज्याचे रेजोल्यूशन 720 x 1280 पिक्सल आहे. स्मार्टफोन चे मेजरमेंट 15.0 x 7.44 x 0.90 cm आहे आणि याचे वजन 170 ग्राम आहे. स्मार्टफोन मध्ये एक रियर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. याव्यतिरिक्त डिवाइस मध्ये मीडियाटेक MT6737 SoC, 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे.
स्टोरेज माइक्रो SD कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येते. स्मार्टफोन डुअल सिम कार्ड्स ला सपोर्ट करतो पण हे स्पष्ट झाले नाही की हा एक हाइब्रिड ट्रे आहे की ट्रिपल कार्ड स्लॉट ट्रे आहे ते. Intex Staari 10 मध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे आणि दोन्ही कॅमेरा LED फ्लॅश ला सपोर्ट करताता. डिवाइस एंड्राइड 7.0 नौगट वर चालतो आणि कनेक्टिविटी साठी हा डिवाइस 4G LTE, VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ, GPS आणि माइक्रो USB पोर्ट ऑफर करतो. डिवाइस मध्ये 2600mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 200 तासांचा स्टँड बाय टाइम देते.
किंमत आणि उपलब्धता
हा स्मार्टफोन 5,999 रुपयांच्या किंमतीत फक्त स्नॅपडील वर उपलब्ध होईल पण याची इफेक्टिव किंमत 3,999 आहे. डिवाइस ग्लॉसी ब्लॅक, शॅम्पियन आणि ब्लू रंगाच्या पर्याया मध्ये उपलब्ध आहे.