इंटेक्सने बाजारात आपला नवीन अॅनड्रॉईड स्मार्टफोन इंटेक्स अॅक्वा Joy लाँच केला. ह्या स्मार्टफोनमध्ये आकर्षक प्रोसेसरसह 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.
इंटेक्सने अॅक्वा Lions 3G स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता एका नवीन स्मार्टफोनची घोषणा केली आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत आहे केवळ २,७९९ रुपये. ह्या स्मार्टफोनचे नाव आहे इंटेक्स अॅक्वा Joy. ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या साइटवर लिस्ट केले गेले आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनला लवकरच विकले जाईल.
ह्या स्मार्टफोनमध्ये 4 इंचाची WVGA 480×800 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. ही डिस्प्ले 233ppi पिक्सेल तीव्रतेसह येते. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. त्याचबरोबर हा एक ड्यूल सिमला सपोर्ट करणारा स्मार्टफोन आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 1.2GHz क्वाड-कोर स्प्रेडट्रम SC7731C प्रोसेसर दिला गेला आहे आणि ह्यात आपल्याला 512MB ची रॅमसुद्धा मिळत आहे. फोनमध्ये आपल्याला 4GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर ह्यात 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट आणि रियर कॅमेरा दिला गेला आहे. तसेच ह्याच्या 0.3 मेगापिक्सेलच्या रियर कॅमे-यासह LED फ्लॅश लाइटसुद्धा मिळत आहे.
ह्या फोनमध्ये 1450mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे, जी कंपनीनुसार ५ तासांचा टॉकटाइम आणि 160 तासांचा स्टँडबाय टाइम देते. फोनच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, ह्यात GPRS/EDGE, 3G, A-GPS, ब्लूटुथ, वायफाय 802.11 b/g/n आणि मायक्रो-यूएसबीसुद्धा दिला गेला आहे.