Intex Indie 5 ची खासियत याची 4000mAh ची मोठी बॅटरी आहे जी या किंमतीच्या फोन्स मध्ये सहसा दिसत नाही.
Intex Indie 5 launched in India only at Rs 4,999: Intex Indie 5 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. Indie 5 ला कंपनी ने 4,999 रुपयांमध्ये लॉन्च केले आहे आणि याची खासियत 4000mAh ची मोठी बॅटरी आहे. हा डिवाइस ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध होईल.
Intex ने Indie 5 मध्ये साधे स्पेसिफिकेशंस दिले आहेत. फोन मध्ये 5 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे याचे रेजोल्यूशन 720×1280 पिक्सल तर एस्पेक्ट रेश्यो 16:9 आहे. डिवाइस मधील डिस्प्ले एक IPS पॅनल आहे जो 2.5D कर्व्ड ग्लास आणि ड्रॅगनोट्रिअल प्रोटेक्शन सह सादर करण्यात आला आहे. Indie 5 मीडियाटेक MT6737 चिपसेट, 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज सह येतो.
कंपनी ने डिवाइस मध्ये माइक्रो एसडी कार्ड स्लॉट पण दिला आहे ज्याच्या माध्यामातून स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येते. कनेक्टिविटी साठी फोन 4G LTE, VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ, GPS आणि माइक्रो USB पोर्ट देतो.
Intex Indie 5 ची सर्वात मोठी खासियत याची 4000mAh ची बॅटरी आहे कारण या किंमतीत मिळणार्या फोन्स मध्ये मोठी बॅटरी क्वचितच मिळते. डिवाइस मध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कैमरा देण्यात आला आहे आणि दोन्ही कैमरा सेटअप मध्ये LED फ्लॅश देण्यात आला आहे. फोन ची जाडी 10.1mm आणि वजन 162 ग्राम आहे.