मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने आपला नवीन स्मार्टफोन क्लाउड जेस्ट लाँच केला आहे. कंपनीने ह्याची किंमत ४,९९९ रुपये ठेवली आहे. सध्यातरी कंपनीच्या साइटवर हा लिस्ट केला आहे आणि लवकरच कंपनी ह्याला अधिकृत साइटवर लाँच करेल, अशी अपेक्षा आहे.
ह्या स्मार्टफोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याची बॅटरी. ह्या स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी १५ तास टॉकटाईम आणि ५०० तास स्टँडबाय वेळ देईल.
ह्या स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर स्प्रेडट्रम (SC7731) प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डने ३२जीबीपर्यंत वाढवू शकतो.
ह्यात LED फ्लॅशसह 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असू शकतो. हा एक ड्युल सिम डिवाइस आहे. हा आऊट ऑफ बॉक्स अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 3G, GPRS/एज, वायफाय 802.11 B/G/N, मायक्रो-USB आणि ब्लूटुथ फीचर आहे. ह्या स्मार्टफोनचे परिमाण 146x74x10.3mm आहे आणि वजन 152 ग्रॅम आहे. हँडसेट काळ्या, शॅम्पेन आणि पांढ-या रंगात मिळेल.